Press "Enter" to skip to content

उरणची अंशिका पाटील ठाण्याच्या सौंदर्य स्पर्धेची मानकरी

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

उरणच्या १२ वर्षीय अंशिका पाटील हिने ठाणे येथे नुकत्याच झालेल्या "इंडियाज प्रिन्स अँड प्रिन्सेस २०२१" हि स्पर्धेची मानकरी होऊन सर्वांची मनेही जिंकली आहेत.

रशियामध्ये प्लस इंटरनॅशनल कॅटेगरी खिताब मिळवून देशाचं नाव उंचावणारी फॅशन डिझायनर संगीता आलशी या स्पर्धेला ज्युरी म्हणून लाभल्या होत्या. ठाणे येथे नुकताच पार पडलेल्या "इंडियाज प्रिन्स अँड प्रिन्सेस २०२१" ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये देशभरातून ६० मुलांची निवड झाली होती. या निवड चाचणीनंतर झालेल्या स्पर्धेमध्ये उरणच्या अंशिका पाटील हिने आपली चमक दाखवित ही स्पर्धा जिंकली आहे.

उरण तालुक्यातील बोकडविरा गावात राहणाऱ्या अंशिकाने २०१९ मध्ये उरणमध्ये झालेल्या "परिवर्तन २०१९" या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ही स्पर्धा जिंकली होती. यानंतर तिने अनेक सौंदर्य स्पर्धामधून सहभाग घेत या स्पर्धांवर राज केले आहे. ठाणे येथे झालेल्या "इंडियाज प्रिन्स अँड प्रिन्सेस २०२१" या स्पर्धेमुळे तिची वाटचाल आता "मिस इंडिया"च्या दिशेने पडणार असल्याने ही स्पर्धा तिच्यासाठी महत्वाची होती. या स्पर्धेसाठी अंशिकाने खूप मेहनत घेऊन तिने आपल्यातील कसब सादर केले होते. स्पर्धेवेळी दाखवलेली चमक आलेल्या पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना भावली असल्याने अंशिकाने ही स्पर्धा जिंकून सर्वांच्या मनावर राज्य केले असल्याचे म्हटले जात आहे.

उरणच्या छोट्याशा गावातील अंशिका आता राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कोरण्याच्या तयारीला लागली आहे. तिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.