Press "Enter" to skip to content

आखिल महाराष्ट्र केंद्रप्रमुख संघटनेतर्फे नारायण सोनवणे सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

कर्जत तालुका शाळेत अखिल महाराष्ट्र केंद्रप्रमुख संघटनेची सभा संपन्न झाली. यामध्ये सर्वानुमते नव्याने कर्जत शाखा कार्यकारिणी करण्यात आली.राज्याचे अध्यक्ष मा श्री डॉ राजेंद्र चौधरी उपस्थित होते.विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.

प्रस्तावना जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री शिवाजी धराडे साहेब यांनी केली. कार्यक्रमात श्री शिरसाड साहेब व श्री भागवत साहेब यांनी मार्गदर्शन केले.श्री गजानन साळुंखे यांची राज्याच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती तर तालुकास्तरीय प्रतिभा साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली.

केंद्रप्रमुख श्री नारायण सोनवणे यांनी विभागस्तरीय महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेत सुयश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार राज्याचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आला.श्री सोनवणे यांनी आपल्या मनोगतात तालुका ते राज्यस्तरीय शैक्षणिक “यशोगाथा “”करून शाळांचा गुणवत्ता विकास करण्यास सर्वांना आवाहन केले.श्री शीरसाड साहेब यांना निवृत्त झाल्याबद्दल सर्वांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास कर्जत तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.