Press "Enter" to skip to content

आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप करून मुलीचा वाढदिवस केला साजरा

सिटी बेल लाइव्ह । उरण । संदीप भोपले ।

जे जे चांगले ते करावे या उक्तीप्रमाणे
या जगात अनेक लोक , अनेक विचार असतात परन्तु प्रेरणादायी तेच जे समाजपुरक कार्य करतील खरच गोर गरीब ही आपण संकल्पना फक्त मनात करत असतो परन्तु प्रत्यक्षात त्यांच्या मधून जाण हे खूप कठीण असत या सर्व गोष्टींला विरोधाभास करत सर्वांच्या पुढं आदर्श निर्माण करणारे काम हे कैलास लकेश्री व आणि त्यांच्या संपुर्ण परिवाराने आपला लाडक्या लेकीचा वाढदिवस हा आदिवासी मुले व बांधवांना मायेची उबदार पांघरून घालणारे ब्लॅंकेट वाटप , तसेच गोड खाऊ वाटप करून साजरा केला.

या वस्तू वाटप केल्यावर आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद होता तो मात्र निराला होता कैलास लकेश्री बोलले की अश्या प्रकारचं काम केल्याने आम्हाला समाधान मिळत असत सदर कार्यक्रम प्रसंगी कैलास लके श्री , मीरा लकेश्री , प्रसाद पाटील माजी (सरपंच वशेनी ) श्री निवास गावंड (सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष ) सारडे विकास मंच अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे श्री प्रशांत म्हात्रे सर , संपेश पाटील रोशन पाटील , मिलन म्हात्रे रोहित पाटील , वाडीवरचे बुवा आणि वैष्णवि लकेश्री चा संपूर्ण परिवार उपस्थित होता तसेच हे सर्व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन नागेंद्र म्हात्रे सर भोपले सर व आभार प्रदर्शन निवास गावंड सर यांनी केले आदिवासी गोरगरिबांना मायेची उबदार ब्लॅंकेट वाटप करून आपल्या मुलीचा वाढदिवस केला साजरा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.