Press "Enter" to skip to content

काँग्रेस जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष सुरेश पाटील यांची कामगिरी

नदिपात्रात कोंबड्यांची पिसे व मांस टाकून दुर्गंधी पसरविणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । राकेश खराडे ।

तळोजा एमआयडीसी लिंक रोडवर सिईटीपीलगत असणा-या पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोंबड्यांची पिसे व इतर मांसाचा भाग टाकून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तिच्या आरोग्यास अपायकारक होईल अशी कृती करुन दुर्गंधी पसरविणाऱ्या दोघा भामट्यांवर पर्यावरण विभाग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश धर्मा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारख ठेवून रंगेहाथ पकडले आहे.

कोरोना महामारी आणि बर्डं फ्ल्यूने नागरिक भयभीत असतानाच गेल्या अनेक दिवस चिकनचा मांस व कोंबड्यांची पिसे कासाडी नदिपात्रात टाकल्याने परीसरात दुर्गंधी पसरली होती.यावेली प्रवास करताना नागरिकांना नाकावर रुमाल धरुन प्रवास करावा लागत होता.या समस्येबाबत आसपासच्या परिसरातील नागरिकांनी पर्यावरण विभागाचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश धर्मा पाटील यांच्याजवल व्यथा मांडली होती.

यानुसार सुरेश पाटील व त्यांचे सहकारी पर्यावरण विभाग अध्यक्ष सुनील लहु भोईर यांनी रात्रीची पारख ठेवली असता एम एच -46,एएफ-4387 आणि एम एच-46,एआर-2681 हे इको टेंपो घेऊन मोहम्मद वसीम (वय २५)वसीम मोहम्मद शेख(वय १८) हे दोघे टेपोतून कोंबड्यांचे मांस भरलेले ट्रे काढून पुलाच्या कठड्यावरुन नदिपात्रात कोंबड्यांची पिसे,पाय,आतडे आदी घटक टाकत असताना सुरेश धर्मां पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाहताच त्यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले.

याबाबत आरोग्य अधिकारी जितेंद्र मढवी, प्रदुषण मंडळाचे किशोर केर्लेंकर,ए.एस.धापटे ,पर्यावरण प्रेमी योगेश पगडे, पोलिस बि.एच.व्यवहारे यांनी पाहणी करून आरोपींवर कारवाई केली.तर दोन्ही एपे टेंपो जप्त करण्यात आले.

दरम्यान पर्यावरणाचा त्रास करणा-यांवर कारवाई व्हावी यासाठी पर्यावरण विभागाचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश धर्मा पाटील यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कोंबड्यांची पिसे व मांस रात्रीच्या वेळेत नदिपात्रात टाकणा-यांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पर्यांवरण प्रदुषित करणा-या नागरिकांवर कारवाई व्हावी यासाठी पर्यावरण विभागाचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुरेश धर्मां पाटील,पर्यावरण विभाग अध्यक्ष सुनिल लहु भोईर,पर्यावरण प्रेमी योगेश पगडे यांनी पाऊल उचलले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.