Press "Enter" to skip to content

जेएनपीटी विरोधात कोळी बांधवांचे चॅनल बंद आंदोलन

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे चॅनल बंद आंदोलन सुरू : पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी स्थगित केलेले जेएनपीटी विरोधात चॅनल बंद आंदोलन आज पहाटेपासून सुरू झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस व इतर जवानांनची कुमक बाहेरून मागविण्यात आली होती. यामुळे हनुमान कोळीवाडा गावाला पोलिसांनी वेढा दिला होता. तरीही आंदोलन सुरू होते.

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जेएनपीटी विरोधात चॅनल बंद आंदोलन सुरू केले होते. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीमुळे १ महिना पुढे ढकलण्यात आले होते. परंतु तरीही मागण्या मान्य न झाल्याने आज पहाटेच्या सुमारास ग्रामस्थ बोटीने जेएनपीटी चॅनल आंदोलन करण्यासाठी घोषणाबाजी करीत रवाना झाले.

चॅनल बंद आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाहेरून पोलीस व इतर कुमक मागविण्यात आली आहे. आज सकाळपासून पोलिसांची कुमक हनुमान कोळीवाडा गावात आल्यानंतर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येन घोषणाबाजी करीत सामील झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.