Press "Enter" to skip to content

रायगडचा सुपूत्र मंदार महामुणकर घेतोय सांगितीक वाद्य संस्कृतीत भरारी…

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम ।

सह्याद्रीच्या विस्तीर्णरांगामध्ये अनेक दुर्मिळ,दुर्लभ रानवनस्पती असतील, त्यांचीनावे आपल्याला माहितही नसतील – अरबी समुद्राच्या अथांग खोलीत अनेक माणिक मोती शिंपल्या मधून दडले असतील… पण त्यांची योग्यता कुठेही कमी पडत नाही . त्यांचे संजीवन… वलयांकित तेज केव्हा न केव्हा आपणास भारावून सोडतं… दिपवून अन व्यापून टाकतं असंच एक हृदयांकित व्यक्तिमत्व म्हणजे… रत्नागिरी जिह्यातील सावित्रीच्या तीरावर ग्रामदेवता आई जनाईच्या मांगल्याने सजलेल्या, नटलेल्या “पडवे” गावाचे सुपुत्र सुनिल महामुणकर व सौ.वैभवी महामुणकर दांपत्या पोटी सरस्वतीचे दान… सांगितीक वाद्यांच्या सर्वच क्षेत्रात अष्टपैलूत्व सिध्द करणारे संगीत संयोजक व वादक कु.मंदार महामुणकर.

परमपुज्य आदरणीय डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी’ यांच्या बैठकरूपी संस्कारांनी प्रेरित असणारे आईवडील दोघेही नोकरदार, कधी रायगड मधील गोरेगांव तर कधी मुंबई अशी फिरती असायची. सुरूवातीला संगीत क्षेत्रात मिरा-भाईंदर येथे वयाच्या 8 व्या वर्षापासून आद्यगुरू पाबळकर गुरूजी यांच्याकडे तबल्याचा श्रीगणेशा मंदारचा झाला. तबल्याचे बाळकडू आजी कै.सुनिला महामुणकर या स्वत: मंदार यांस कडेवर घेऊन गुरूजींकडे तबल्याच्या दिक्षेसाठी जात असतं.सात वर्षे गुरूजींकडे तालीम घेतली व ती तालीम घेत असताना मिरा-भाईंदर महानगरपालिकेत वादन स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मंदार यास मिळाले. तिथेच मंदार महामुणकर या उद्योन्मुख तबला वादकाच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली गेली…

यानंतर अविरतपणे सांगितिक तपश्चर्येला त्याची सुरूवात झाली. रायगडमधील गोरेगांवमध्ये 7 वी ते महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना देखील मुंबईत संगीताचे शास्त्रसुध्द शिक्षण घेतले. साईनाथ म्हात्रे सर यांच्या कडून तबल्याचे शास्त्रोक्त शिक्षण सातत्यपूर्ण सुरू आहे. विष्णू म्हात्रे सर यांच्या माध्यमातून पखावज या वाद्यात पारंगतता मिळविण्याचा प्रयत्न केला तर साईनाथ म्हात्रे यांच्या सुचनेनुसार मुंबईत राजेंद्र साळवी यांच्याकडे गेल्या 11 वर्षापासून ढोलकीचा बाज अंगीकृत करण्याचा सराव सुरू आजता गायत आहे…

“मेहंदीच्या पानावर” ही गानमालिका गाजविणारे व उत्कृष्ठ ढोलक वादक करीमबाबा यांचे शिष्य मधूबने सर (मुंबई) यांच्याकडे गेल्या तीन वर्षापासून ढोलक या वाद्य प्रकारवर अभ्यासपूर्ण मंदार याचा रियाज चालू आहे. सध्याच्या आधुनिक युगात ’हेण्डसॉनिक’ हे इलेक्ट्रॉनिक वाद्य भारतात आल्यावर त्याचे मार्गदर्शन नाशिक मधील स्वरंजय धुमाळ सर यांच्याकडे सुरू आहे.एवढया आयाससयासातून त्याने शिक्षणाची कास कधीही सोडली नाही.महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना2015 मध्ये ’पुणे गायनसमाज’ या संस्थेकडून’ तबला विशारद’ पदवी संपादन केली. सध्या स्थितीत  B.Sc.B.Ed. करून मुंबईमध्ये Seven SquareAcademic Mira Rd या C.B.S.C बोर्डच्या विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

राजेंद्र साळवी यांच्या मार्गदर्शनातून दिमडी, बघलबच्चा, संबळ, ढोलतसेच विविध वाद्येया सारख्या पारंपारीक वाद्यांमध्ये झालेली प्रगती त्यास लौकिकाला साजेशी आहे. रायगड जिल्ह्यात गोरेगाव येथील हा होतकरू तरुण सध्या मुंबईतही आपला नावलौकिक करीत आहे.देणा-याने देतजावे, घेणा-याने घेत जावे… घेता-घेता देणा-याचे हात घ्यावेया कवी करंदीकरांच्या ओळीप्रमाणे मंदार महामुणकर यांना मिळालेले सांगितीक ज्ञान आपल्या खाजगी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनादेत असून बालसंगीत प्रेमी शिष्यांची फळी निर्माण केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या N.S.S. विभागातून झालेल्या युथफेस्टीवल उत्कर्ष 2014 या स्पर्धेत रायगड जिल्हयातून व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सध्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम सुरू असून, अक्षय भगत प्रोडक्शन निर्मित तेजस पवार यांच्या संगीत संयोजनाखाली वेडेमन व विठुमाऊली या गाण्यांसाठी मंदार महामुणकर यांनी तबल्याची साथ चढविली. हयातील वेडे मनहे गाणे हिंदुस्थान टाईम्स मध्ये नॉमिनेट झाले.तसेच महाड-माणगांव-पोलादपूर या मतदारसंघातील सी.एम.चषक, मीरा-भाईदर मधील स्वस्तिक वेल्फेअर असोसिएशन… इकोफ्रेंडली गणरायाचे कार्यक्रम, शूरा मी वंदिले निजामपूर-माणगांव अशा विविध कार्यक्रमातून संगीत संयोजक ते तबल्याची तसेच विविध वाद्यांची जबाबदारी सहजरित्या व उत्कृष्ठरित्या पार पाडली. मंदार यांनी संगीतक्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली खरी, पण यामागे त्यांचे कुटुंबिय व मित्र परिवार,शिक्षक यांचे प्रोत्साहन सहकार्य लाभले. त्यांच्या वयाची मुले डॉक्टर, इंजिनियर होत असताना आपल्या मुलाने संगीतातच आपले पाय घट्ट रोवून उभे राहावे यासाठी दिलेलं मानसिक, आर्थिक आधार मोलाचा वाटतो. बहिणी धनश्री, यामिनी तसेच भावी जोडीदार अमृता पोटसुरे या निर्भिडपणे त्याच्या पाठीशी उभ्या राहिल्या. श्री.डांगेसर, श्री.सचिनगोरेगांवकर, श्री.चेरफळेसर यांसकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले.,मित्रांच्या साथीने, प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष अशा अनेक हितचिंतकांच्या शुभाशिर्वादाने मंदार यांनी उज्वल यश मिळविले. यासर्वाचे ॠण तो कधीही विसरू शकत नाहीत.

आज मंदार महामुणकर हे एक बेजोड तबलावादक, अफलातूनरित्या वाद्यवृंदामधे हातखंडा असलेला हरहुन्नरी कलाकार म्हणून सर्व परिचित आहेत. तबल्याची वढोलकीची थाप पडताच रसिक मायबापांच्या काळजाचा ठाव घेणारा गुणीकलावंत रायगड अशा जिल्हयात नावलौकिक आहे. मुंबई महाराष्ट्रातील विविध भागातून लोकसंगीत,भाव, सुगम संगीत या कार्यक्रमातून तबल्याच्या व ढोलकीच्या जादूची पखरण करून आपल्या अदाकारीचा नवा आयाम त्याने निर्माण केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.