Press "Enter" to skip to content

चारित्र्यांवर संशय घेतल्याने विवाहित महिलेची आत्महत्या

आत्महत्या नसून घातपात…. मिळकतखार येथील ग्रामस्थांची दोषींवर कठोर शासन करण्याची मागणी !

सिटी बेल लाइव्ह । अलीबाग । अमूलकुमार जैन ।

चारित्र्यावरं संशय घेतल्याने अलिबाग मधील शिरवली गावातील एका विवाहित महिलेने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. १०फेब्रुवारी रोजी सदर धक्कादायक घटना घडली होती.
याबाबत पोयनाड पोलिस ठाण्यातआत्महत्येस पृवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विवाहित मयत विशाखा  ही अलिबाग मधील मिळकतखारची कन्या आहे. शिरवली मधील पति व कुटुंबातील सदस्यानी पूर्वनियोजित कट रचून आमच्या निष्पाप विशाखा ची हत्या केली आहे असे मिळकतखारच्या ग्रामस्थानी   संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. मयत विशाखा चे  बंधू  विवेक कडवे ह्यानी देखील आपल्या संतापजनक प्रतिक्रिया देत माझ्या बहिणीला पति मकरंद म्हात्रे ह्याच्या  कडून वेळोवेळी मानसिक त्रास होत असे.तिची आत्महत्या नसून हा घातपात आहे असे  मयत विशाखा चे बंधू विवेक कडवे यांनी म्हटले आहे.

आई ,बहीण व मिळकतखार येथील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त करत. मयत विशाखाच्या आत्म्याला तेव्हाच शांती मिळेल जेव्हा तिच्यावरं झालेल्या अन्यायाला वाचा फुटेल तेव्हा दोषींवर कारवाई कठोर करा न्याय व्यवस्थेवर आमचा अजूनही विश्वास आहे.  मयत विशाखाला न्याय दया मयत विशाखा
ने आत्महत्या केली नसून हा घातपातच़ आहे.याबाबत प्रशासकीय यंत्रणा निष्पाप मयत विशाखाला न्याय देईल हीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.