विष्णू लोखंडे यांनी सामाजीक बांधीलकी जपत स्वखर्चाने बांधला बसथांबा
सिटी बेल लाइव्ह । रोहा । प्रतिनिधी ।
रोहे-कोलाड मार्गावर वसलेल्या अशोकनगर किल्ला येथे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित नागरिक विष्णू लोखंडे आणि परिवार यांनी स्वखर्चाने बांधलेल्या बसथांब्याचे लोकार्पण सोहळा शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
अशोकनगर किल्ला येथील ग्रामस्थांनी रोहे-कोलाड मार्गावरील आपल्या गावच्या हद्दीत रस्त्याला लागून बसथाब्याची नितांत गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ नेते विष्णू लोखंडे यांना सांगितले असता श्री. विष्णू लोखंडे यांनीही क्षणाचा विलंब न लावता व ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन त्वरीत आपले स्व.तुकाराम वडील लोखंडे यांच्या स्मरणार्थ सदरचे बसथांब्याचे बांधकाम स्वखर्चाने पुर्ण करून दिले.
रोहा डेपो वाहतूक निरिक्षक शंकर खानापूरकर,यांच्या शुभहस्ते या बस थांब्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपसरपंच दीपक जमदाडे,महादेव लोखंडे, प्रणिल लोखंडे,अशोकनगर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष संदीप पालकर,अशोक चांदोरकर, जितेंद्र पालखर,श्री.विष्णू सेवाभावी संस्था अध्यक्ष अक्षय जाधव,न्रुत्य दिग्दर्शक शैलेश साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
अशोकनगर ग्रामस्थांना अशाप्रकारचे बसथांब्याची नितांत गरज होती ती गरज लोखंडे परिवाराचे माध्यमातून पुर्ण झाल्याने ग्रामस्थांनी लोखंडे परिवारास धन्यवाद दिले आहेत तर या बस थांब्यामुळे शाळा काँलेजचे विद्यार्थी, दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी ग्रामस्थ तसेच वयोवृद्ध मंडळी व महिला वर्गाला चांगलाच फायदा होईल अशाप्रकारची क्रुतज्ञपणाची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Be First to Comment