Press "Enter" to skip to content

कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांवर महायुतीचे सभापती


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड झाली, या चारही समित्यांवर शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे सभापती विराजमान झाले आहेत, चारही सभापती बिनविरोध विराजमान झाल्याने महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

नगरपरिषदेच्या सभागृहात विषय समित्यांच्या निवडीसाठी पीठासीन प्राधिकारी म्हणून कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगर परिषदेमध्ये 18 नगरसेवक आहेत, त्यापैकी 10 नगरसेवक महायुतीकडे आहेत तर 8 नगरसेवक राष्ट्रवादी – मनसे -स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी-शिवराय भिमराय क्रांती संघटना या महाआघाडीचे आहेत.

विषय समिती सभापती

स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष-अशोक ओसवाल, सदस्य-विवेक दांडेकर, विशाखा जिनगरे, शरद लाड, उमेश गायकवाड.

पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती-राहुल डाळींबकर, सदस्य- नितीन सावंत, वैशाली मोरे, सुवर्णा निलधे, सोमनाथ ठोंबरे

विज, सार्वजनिक बांधकाम, शहर नियोजन विकास समिती सभापती-स्वामिनी मांजरे, सदस्य-बळवंत घुमरे, प्राची डेरवणकर,भारती पालकर, मधुरा चंदन-पाटील.

महिला व बालकल्याण समिती सभापती- संचिता पाटील,उपसभापती-प्राची डेरवणकर सदस्य- विशाखा जिनगरे, पुष्पा दगडे, ज्योती मेंगाळ.

स्थायी समिती पदसिद्ध सभापती -अध्यक्ष सुवर्णा जोशी, सदस्य – अशोक ओसवाल, राहुल डाळींबकर, स्वामिनी मांजरे, संचिता पाटील.

निवडणूक कामकाज कामी सहाय्यक पीठासीन प्राधिकारी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.