Press "Enter" to skip to content

ऐनघर ग्राम पंचायत अपहाराची चौकशी येत्या चार दिवसात करणार

गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांचे आश्वासन

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील नामवंत व श्रीमंत समजली जाणारी ऐनघर ग्राम पंचायतीच्या अपहार व भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणिकरता माजी सरपंच व शेकापचे जेष्ठ नेते महादेव मोहिते सह ऐनघर ग्राम पंचायत हद्दीतील ग्रामस्थ रोहा पंचायत समिती आवारात 22 फेब्रुवारी रोजी उपोषणास बसले होते या मागणीला रोहा पं सं गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी सदरच्या ग्रामस्थांना लेखी पत्राद्वारे सदरच्या अपहार व गैरव्यवहार याची येत्या चार दिवसात चौकशी करून याचा आवाहल सादर केला जाणार असल्याचे उपोषण कर्त्यांना सांगितले आहे.

तालुक्यातील नामवंत आणि सुपरिचित असलेल्या ऐनघर ग्राम पंचायतीचा 14 वा वित्त आयोग,केंद्र सरकारकडून येणारा दीड कोटी निधी तसेच जनरल फंड एक कोटी 72 लाख असा मिळणारा निधी सन 2019-2020 या आर्थिक वर्षात जमा झाला परंतु हा निधी अनियमितपणे खर्च झाले असल्याचे मोहिते यांनी या बाबत चौकशी करत या तीन कोटी रुपयांमध्ये दीड कोटी रुपये चेकद्वारे सेल्फ, बेअरर, कॅश रक्कम काढून त्याचे खोटे मस्टर खर्ची टाकून खर्च केले असल्याचे मिळविलेल्या माहितीच्या अधिकाराखाली आढळून आले आहे .अर्ज करून मिळालेल्या माहितीमुळे या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितपणे खर्च करून अपहार होत असल्याचे समोर आणत मोठा गैरव्यवहार व याची कसून चौकशी झाली पाहिजे अशी अनेकदा मागणी केली होती तसेच या बाबत कोणीही पुरेशी माहिती प्रशासकीय अधिकारी वर्गांकडून मिळत नसल्याने या ग्राम पंचायत हद्दीतील सत्तर वर्षाचा तरुण पुढाकार घेत या बाबत चौकशी करण्यात आली पाहिजे आणि संबंधितांवर कारवाही झाली पाहिजे यासाठी ऐनघर ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांनी रोहा पं सं च्या आवारात 22 फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यात आल्याने प्रशासकीय यंत्रणेला जाग येत येत्या चार दिवसात या सर्व प्रकारच्या चौकशी केली जाणार आहे.

महादेव मोहिते, दिनेश कातकरी, राजेश सुटे ,धर्मेंद्र शिद,प्रफुल कणघरे, मंगेश लाड,अनिल लाड,दत्तात्रेय तेलंगे,विवेक हरपाल, दिनेश करंजे ,सह ग्रामस्थ व बेरोजगार संघटनेचे पदाधिकारी या उपोषणास बसले होते.

सदरच्या उपोषणाला पशुराम वाघमारे, विनायक धामणे, गोपीनाथ गंभे, गणेश खरीवले, जितेंद्र जोशी, सुशांत भोकटे, जितेश रटाटे दिनेश भोकटे, प्रशांत जाधव,रोहा तालुका शेकाप सरचिटणीस राजेश सानप, नितीन तेंडुलकर जेष्ठ पत्रकार विजय देसाई आदींनी भेट दिली
रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर तसेच गटविकास अधिकारी अनिकेत पाटील यांनी ऐनघर ग्राम पंचायत बाबत उपोषण कर्त्यांना सांगितले की या बाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी केली जाणार असून याबाबत लेखी पत्र दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.