Press "Enter" to skip to content

रोहा तालुका कुणबी समाजग्रुपची पुनर्बांधणी करणार : शिवराम शिंदे

रोहा तालुका कुणबी समाज कार्यकरणीची बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

स्व माजी आमदार पा.रा.सानप कुणबी भवन रोहा येथे रोहा तालुका कुणबी समाज कार्यकरणीची बैठक तालुकाध्यक्ष शिवराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी या बैठकीत तालुक्यातील कुणबी समाज ग्रुपची पुनर्बांधणी करणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.

यावेळी शिवराम महाबले, दत्ताराम झोलगे, दगडूशेठ सानप, सुनील ठाकुर, गोपीनाथ गंभे, सुहास खरीवले, पांडुरंग कोंडे, पांडुरंग सानप,गंभे गुरुजी,हभप नारायण महाराज दहिंबेकर ,संतोष भोईर, खेळू ढमाल, परशुराम आंब्रे, ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश मगर आदी तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

कोरोना संकट काळात कुणबी समाजाची बैठक होऊ शकली नाही तसेच या महामारीच्या काळात कुणबी समाजाचे नेते बाळशेट लोखंडे, यशवंत सहादेव शिंदे (तात्या) यांचे निधन तसेच रोहा तालुक्यातील सर्व समाज बांधव यांना सुरवातीलाच श्रद्धांजली वाहण्यात आली.कुणबी समाज अध्यक्ष शिवराम शिंदे यांनी समाजाची विभागांचे ग्रुप पुनर्बांधणी करून समाजाच्या जातीच्या दाखल्या साठी समाजनेते बावकर साहेब याना सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावं निहाय माहिती गोळा करून रायगडचे खाजदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या समावेत चर्चा करून राज्याचे मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सत्र करण्यास समाजनेते बावकर साहेब हे मंत्रालयात प्रयत्न करत आहेत तसेच कोरोना संकटामुळे सदरच्या वर्षभरात कोणतेही बैठक व कार्यक्रम झाले नासल्याने पुन्हा एकदा समाजासाठी एकत्रित व एक संघटित राहून समाज्याच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

तसेच ओबीसी संघर्ष सन्मवय समितीचे रोहा तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश मगर यांनी समाजातील जुन्या लग्न पध्दती बंद करून एक दिवसांत विवाह सोहळा संपन्न झाले पाहिजे.तसेच उत्तरकार्या मध्ये जे गोड पदार्थ केले जातात या पध्दती देखील पुन्हा बंद झाल्या पाहिजेत. आपण सर्वानी चणेरा ग्रुपचा आदर्श घेत काही रूढी परंपरा जोपासत काही गोष्टींवर निर्भधं घालण्यास समाजबांधवांनी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी केले आहे.
तद्नंतर पांडुरंग कोंडे यांनी स्व.यशवंत शिंदे यांनी समाजासाठी दिलेले योगदान आणि कोणत्याही कार्यक्रमात हिरहिरने भाग घेत सहकार्य करणारे तात्या यांना समाज कधीच विसरू शकत नाही असे दुःख व्यक्त केले.

सदरच्या बैठकीत सुहास खरीवले यांनी पा.रा.सानप भवन यासाठी झालेला जमा खर्च वाचून दाखवले तर सुनील ठाकुर यांनी शेवटी आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.