Press "Enter" to skip to content

विस्तारित कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन

कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोत्तपरी सदैव सहकार्य करीत राहणार – आमदार प्रशांत ठाकूर

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे हि आपली कायम भूमिका असते, त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोत्तपरी सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्र येथे केले.

ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार प्रधानत ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हंटले कि, तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये माथाडी, ट्रान्सपोर्ट, जनरल असे विविध प्रकारचे कामगार गणले जातात. या सर्व कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्वाची गरज लागते. मला नक्की खात्री आहे नंदकुमार म्हात्रे त्या दृष्टिकोनातून त्यांना निश्चितपणे चांगले नेतृत्व देतील आणि त्यांना राजकुमार म्हात्रे व सहकारी कामगारांच्या उन्नतीसाठी ताकद देतील, असा विश्वास व्यक्त करून या परिसरामध्ये कामगारांचे शोषण-पिळवणूक होऊ नये, यासाठी हि संघटना काम करेल आणि त्यासाठी त्यांना लागेल ते सहकार्य आम्ही देऊ, अशी ग्वाहीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, जीएसटी मुंबई विभाग आयुक्त राजेंद्र सरवदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक संतोष भोईर, नगरसेवक विष्णू जोशी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, साक्षी इन्टरप्रायझेसचे सतीश म्हात्रे, राजू चव्हाण, वलप सरपंच भोलानाथ पाटील, माजी सरपंच गोविंद गायकर, किरण दरे, दीपक बोन्डे, शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, तळोजा मजकूर माजी सरपंच संतोष पाटील, सुनील गोवारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे राजकुमार म्हात्रे आणि भाजपचे प्रभाग क्रमांक १ चे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी स्वागत केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.