Press "Enter" to skip to content

आम्ही सुशिक्षित

आम्ही सुशिक्षित

प्रगती पुस्तकावर गुणांची नव्वदी पार असते
पण साध्या हिशोबा साठी यंत्राची गरज भासते
अस्थिर , बेफाम बुद्धी प्रलोभनाला बळी पडते
होत्याचं नव्हतं होतं अन बोल नशिबाला लावतो
आम्ही मात्र स्वतःला सुशिक्षित म्हणून मिरवतो
चंद्र , नक्षत्र , ग्रह-तारे साऱ्यांचेच ज्ञान आम्हाला
कठीण प्रसंगी मात्र आडवे का बर येतात हे आम्हाला?
मग त्या ग्रहांना शांत करायला नखभर खड्यांची मदत घेतो
सारे काही आपणच करतो पण दोष मात्र ग्रहांना लागतो
आम्ही मात्र स्वतःला सुशिक्षित म्हणून मिरवतो
सोशल मिडीयावर तासाभरात ओळखी वाढवतो
शेजारी राहणारा मात्र आमच्यासाठी अनोळखी असतो रस्त्यावर थुंकणाऱ्याला उघड्या डोळ्यांनी माफ करतो
आम्ही मात्र स्वतःला सुशिक्षित म्हणून मिरवतो
मंदिरातल्या देवाला नेवेद्य पंचपक्वांनाचा दाखवतो
मंदिरा बाहेर थरथरता हात एका घासासाठी तिष्ठत राहतो
कितीही कमावलं तरी ते पुरत नाही
कमावलेलं गेलं कसं तेच मुळी कळत नाही
पैसा, प्रसिद्धी च्या मागे धावलो, थांबायचं कुठे हेच विसरलो
सुशिक्षित म्हणून आम्ही मात्र गावभर मिरवत राहिलो
झाल्या असतील चुका आता त्या सुधारू
माणुसकीचा वसा प्रत्येकाने हाती घेऊ
येणाऱ्या प्रत्येक संकटाला एकजुटीने सामोरे जाऊ
सुजाण समृद्ध पिढी घडण्यासाठी स्वतः पासून सुरवात करू
अन मग आम्ही सुशिक्षित आहोत हे गर्वाने मिरवू

सौ.शीतल उमेश कुलकर्णी, विचुंबे

One Comment

  1. Neelima Deshpande Neelima Deshpande February 23, 2021

    मस्त वास्तवदर्शी कविता! अशीच लिहीत रहा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.