Press "Enter" to skip to content

कोळी बांधवांचा आवाज हरपला

ठाणे शहराचे माजी महापौर,आमदार, कोळी बांधवांचे नेते अनंत तरे यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह । ठाणे । अजय शिवकर ।

ठाणे शहराचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे निधन झाल आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु सोमवारी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन नातवंडे भाऊ असा परिवार आहे. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत १९९२ रोजी अनंत तरे हे पहिल्यांदा नगरसेवक म्हणून राबोडीतून निवडून आले होते. त्यांनी ३१ मार्च ९३ साली प्रथम ठाणे महापालिकेचं महापौरपद भूषवलं. त्यावेळी ११ अपक्ष नगरसेवक निवडून आल्याने सर्वदुष्टी कोणातून प्रबळ असणाऱ्या व्यक्तीला महापौर पदाची उमेदवारी देणे गरजेचं असल्याने शिवसेनेतून अनंत तरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर ९४ आणि ९५ साली असे सलग तीनवेळा त्यांनी महापौरपद भूषवलं . ठाणे महापालिका महापौरपदाची हॅट्रिक साधणारे एकमेव व्यक्ती त्यावेळी एक वर्षाची मुदत होती .

दोन वेळा रायगड येथून लोकसभेची उमेदवारी ९८ आणि ९९ साली. १९९७ साली शिवसेनेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या उपनेतेपदावर वर्णी २००० साली विधानपरिषदेची आमदारकी . २००६ साली विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भास्कर जाधव यांच्याकडून पराभव. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर मतदारसंघातून त्यांना डावलून काँग्रेस मधून शिवसेनेत आलेले नारायण राणें समर्थक रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिल्याने थेट शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत. कोपरी -पाचपांखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंडाच निशाण फडकवत भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल. पण अवघ्या २४ तासांत मातोश्री वर बोलवून घेत पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे यांनी नाराजी दूर केल्यावर उमेदवारी मागे घेत पुन्हा शिवसेनेत कार्यरत झाले होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.