Press "Enter" to skip to content

16000 हजार नागरिकांना मिळणार पाणी

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात न्हावा-शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेचे भुमिपुजन

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनीनजीकच्या मुंबई पुणे जुन्या महामार्गांवरील भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून न्हावा शेवा टप्पा -3 पाणी पुरवठा योजनेचे भुमिपुजन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी दुपारी जलशुध्दीकरण केंद्र भोकरपाडा येथे संपन्न झाला.

मोहोपाडा येथील जनता विद्यालय हेलिपॅडवर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आगमन होवून पुढे वाहनाने भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राकडे भुमीपुजन सोहळ्याकरीता रवाना झाले.यावेली उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रम स्थली स्वागत होवून प्रथम राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते न्हावा -शेवा टप्पा-3पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदीती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार मनोहर भोईर , आमदार अनिकेत तटकरे,राजिप अध्यक्षा गिता पारधी, जेएनपीटी चेअरमन संजय सेठी ,महापौर डॉ.कविता चौतमल ,सरपंच अॅड.नीयती बाबरे आदीसह इतर शासकीय पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन केल्याचे दिसून आले.
न्हावा-शेवा परीसरातील वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण, लोकसंख्या पाहता 228 एमएलटी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली असून या योजनेला 493 कोटी खर्च येणार आहे.या योजनेने 16000 हजार नागरिकांना पाणीपुरवठा होणार असून सन 2021चा हा तिसरा पाणीपुरवठा टप्पा वर्षंभरात पुर्ण होणार आहे. पातालगंगा नदीतून पाणी घेऊन पुढे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया करून पुढे न्हावा-शेवा टप्यात पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी न्हावा-शेवा टप्पा-3पाणीपुरवठा योजनेचे कौतुक करुन या योजनेचा लाभ हजारो नागरिकांना मिळणार आहे.

न्हावा-शेवा परीसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण व नागरीकरण पाहता तिसऱ्या टप्प्यातील ही 228 एमएलटी पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण होईल असे सांगितले.पुन्हा कोरोनाचे संकट आहे तरी सर्वांनी खबरदारी घेवून सोशल डिस्टिंक्शन चे पालन करावे असे आवाहनही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

यावेळी महेश पाठक प्रधान सचिव नगर विकास – 2 , डाॕ.संजय मुखर्जी (भाप्रसे)उपाध्यक्ष व व्यवास्थापकीय संचालक सिडको,संजय चहादे (भाप्रसे ) अप्पर मुख्य सचिव पाणी पुरवठा व स्वछता विभाग ,किशोर राजे निंबाळकर (भाप्रसे)सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , सुधाकर देशमुख आयुक्त पनवेल महानगर पालिका यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला.

दरम्यान खुप दिवसापासून रसायनी तील सामान्य नागरिकांना नादरुस्त रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. यावेळी मुख्य मंत्री,उपमुख्य मंत्री येणार यासाठी संबधितांना वेगाने रस्ता दुरुस्ती केल्याने समाधान तसेच शासकीय संबंधित अधिकारी यांच्या वर खोचक टीका टीपण्या ही नागरिकांत रस्त्या रस्त्यावर होत असताना ऐकायला मिळाल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.