Press "Enter" to skip to content

स्थानिकांना विश्वास : माथेरान मिनिट्रेनच्या खाजगीकरणामुळे पर्यटन क्रांती घडणार !

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

माथेरान मिनिट्रेनच्या सेवेबाबतीत रेल्वे प्रशासनाचा नेहमीच नकारात्मक दृष्टिकोन पहावयास मिळत असल्याने ह्या सेवेचा लाभ पर्यटकांना कधीच मनमुरादपणे घेता आला नाही. नेहमीच काहिनाकाही तांत्रिक कारण पुढे करून नेरळ माथेरान ही सेवा जवळजवळ बंदच करण्यात आली आहे. माथेरान करांसह पर्यटकांची सुद्धा ही ट्रेन जीवनवाहिनी बनलेली असतांना आजवर या ट्रेनच्या सफरीसाठी देशविदेशातील पर्यटक भेट देत असतात परंतु नेरळ माथेरान सेवा बंद असल्याने सर्वांचा हिरमोड होत आहे.

अमन लॉज ते माथेरान दरम्यान या ट्रेनची शटल सेवा उपलब्ध असल्यामुळे तरी माथेरानच्या पर्यटनामध्ये जान आलेली आहे अन्यथा एक भकास पर्यटनस्थळ म्हणून याची ओळख निर्माण झाली असती. स्थानिकांच्या पाठपुराव्यामुळे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांमुळे निदान शटल सेवा सुरू आहे त्यामुळेच इथल्या स्थानिकांसह तालुक्यातील जवळपास पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. नेरळ, कर्जत त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना केवळ माथेरानच्या पर्यटनावर अवलंबून राहावे लागत आहे.

नेरळ माथेरान मिनिट्रेन सेवा बंद असल्यामुळे नाईलाजाने पर्यटकांना खाजगी वाहनाने अव्वाच्या सव्वा रक्कम मोजून हा घाटरस्त्याचा सात किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.नेरळ माथेरान अशीच मिनिट्रेन सेवा सुरू झाल्यास सर्वानाच फायदेशीर ठरणार आहे. येणारे पर्यटक हे खासकरून मिनिट्रेनच्या सफरीसाठी येत असतात. ऐन गर्दीच्या वेळी तिकीट उपलब्ध न झाल्यास खाजगी वाहनाने प्रवास करू शकतात त्यामुळे खाजगी वाहन चालकांना सुध्दा रोजगार उपलब्ध होऊ शकतो.असे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

खाजगीकरणामुळे उत्तम दर्जाची सेवा पर्यटकांना भेटेल, देशातील चार पर्यटन स्थळी चालणाऱ्या ह्या मिनी ट्रेन तोट्या मद्धे चालत आहेत त्याचा मोठा फटका रेल्वे प्रशासनाला सोसावा लागत आहे, आणि त्या मुळे सरकार ह्या ट्रेन भविष्यात बंद करू शकते, आपले आर्थिक गणित पर्यटनावर अवलंबून आहे आणि या पर्यटनाचा खरा कणा माथेरान ची मिनी ट्रेन आहे, ही बंद झाली तर आपल्याला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते,केंद्र शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे, आपली माथेरान ची मिनी ट्रेन अविरत चालू राहून पर्यटकांना, आपल्याला उत्तम दर्जाची सेवा मिळेल, वाहतुकीचा प्रश्न ही या मुळे सोडवण्यास मदत होईल, रेल्वे ला माथेरानच्या ट्रेन मूळे दर वर्षी ८० कोटींच नुकसान होते, अंदाजे १०० कोटी चा खर्च होतो तर पर्यटनाच्या माध्यमातून रेल्वेच्या तिजोरीत २० कोटी जमा होतात एवढ्या मोठा तोटा रेल्वे प्रशासनाला होऊन सुद्धा प्रशासन रेल्वे सेवा देत आहे, सरकार ने खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे,पर्यटकांना अधिक अधिक सुख सोई मिळतील व आपल्याला चांगला रोजगार प्राप्त होईल.

प्रेरणा प्रसाद सावंत — नगराध्यक्षा माथेरान नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.