Press "Enter" to skip to content

सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी

खासदार श्रीरंग बारणे व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले लोकार्पण सुंदर शिवसृष्टी  उभारल्याबद्दल सभागृहनेते परेश ठाकूर यांचे कौतुक आणि आभारही 

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून,  मागणीतून आणि सातत्यपुर्ण  पाठपुराव्यातून पनवेल शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाले. 

सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्यासाठी  केलेल्या संकल्पना व पाठपुराव्या बद्दल त्यांचे यावेळी मान्यवरांसह पनवेलकरांनी कौतुक करण्यात आले.     या सोहळ्यास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, अनिता पाटील, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, शहर अभियंता संजय जगताप, नगरसेवक अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, अजय बहिरा, निलेश बाविस्कर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, राजेश्री वावेकर, हेमलता गोवारी, वृषाली वाघमारे, कामोठे मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी, शशिकांत शेळके, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, अमरीश मोकल, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. 
         

पनवेल  महानगर पालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची संकल्पना व मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी करून या संदर्भात सातत्त्याने पाठपुरावा केला. त्यानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाचे सुशोभीकरण पूर्ण झाले आहे.  सुशोभीकरणात संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले असून ५२८ चौ. मी. जागेत १०० चौ. मी. चौथरा बांधण्यात आला आहे तसेच मावळे आणि हत्ती असे एकुण २२ शिल्प उभारण्यात आले आहेत.त्याचबरोबर परिसरात हिरवळ आणि विद्युत रोषणाई, तसेच शिवकालीन वेगवेगळ्या प्रसंगाचे फ्रेम लावण्यात आले आहेत. यासाठी जवळपास ०१ कोटी ७५ लाख रुपये खर्च झाला आहे. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कृष्ट तत्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाच्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर युगपुरुष. अशा या युगपुरुषाचा इतिहास तरुणांबरोबरच शिवप्रेमींना प्रेरणादायी ठरण्यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर आणि सत्ताधारीं पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या विषयी सभागृहात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने काम पूर्ण होऊन आज लोकार्पण झाले.  

कोट- पनवेल शहर वाढतोय, नागरिकांना आवश्यक काय आहे ते देण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळा आदर सर्वांच्या मनात आहे.  पनवेलच्या नावलौकिकामध्ये भर घालणारा हा सुशोभीकरण प्रकल्प आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून येथे शिवकाल, गड  किल्ले स्मरणात यावे असे काम झाले आहे, त्याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांना धन्यवाद देतो.

– खासदार श्रीरंग बारणे 

कोट- पनवेलच्या वैभवात भर टाकणारे सुशोभीकरण झाले आहे. या ठिकाणी नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाच शिवकालीन प्रचिती येणार आहे. त्यामुळे सर्वाना अभिमान वाटेल असे काम झाले आहे. पनवेलमध्ये असलेली अभिमानाची स्थाने विकसित करण्याचे त्याचबरोबर पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहरात व ग्रामीण भागात विविध विकासकामे होत आहेत.

– आमदार प्रशांत ठाकूर 

कोट- छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सुशोभीकरण करण्याची संकल्पना व तसा प्रस्ताव सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मांडण्याबरोबरच ते काम पूर्णत्वास नेण्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला.

– महापौर डॉ. कविता चौतमोल 

कोट-  शिवसृष्टी दर्जेदारपणे साकारली गेली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार काम पूर्ण झाले असून शिवकालीन काळ अनुभवायला मिळणार आहे हि पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

– सभागृहनेते परेश ठाकूर 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.