कर्जत मधील 25 वर्षाची रुचिता सोलंकी घेणार संन्यास : 15 फेब्रुवारी रोजी घेणार दीक्षा
सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत मधील श्रीमती कांताबाई सोगमलजी सोलंकी परिवारातील रुचिता सोलंकी 15 फेब्रुवारी रोजी संन्यास (दीक्षा) घेणार आहे. ती संन्यास घेणारी कर्जत शहरातील दुसरी मुलगी ठरणार आहे.
कर्जत शहरातील श्रीमती कांताबाई सोगमलजी सोलंकी परिवारातील सुभाष, कविता सोलंकी यांची कन्या रुचिता सालंकी (वय-25 ) हिने इंटरियल डिझायनर केले आहे. रुचिता सामाजिक कर्तव्याचा त्याग करुन 15 फेब्रुवारी रोजी आध्यात्मिक कर्तव्याचा स्विकार करणार आहे, ती संन्यास (दिक्षा) घेणार आहे. आज दि.10 फेब्रुवारी रोजी कर्जत मधील जैन महिला मंडळाच्यावतीने कर्जत मधील जैन मंदिर पासून रुचिता ची मिरवणूक काढण्यात आली होती, ही मिरवणूक मुख्य बाजार पेठेतून पुन्हा जैन मंदिरात आली, मिरवणुकीत सजवलेल्या बैलगाडीवर रुचिता विराजमान झाली होती, या मिरवणुकीत फक्त महिला सहभागी होत्या, त्या वाद्याच्या तालावर नाच करत होत्या.

कर्जत सारख्या छोट्या गावात 4 मार्च 2014 रोजी टिनाकुमारी हिने संन्यास घेतला होता, कर्जत तालुक्याच्या इतिहासात प्रथम दीक्षा घेतल्याची नोंद टीना कुमारीच्या नावावर आहे. आज 7 वर्षां कालावधी नंतर 15 फेब्रुवारी रोजी रुचिता दीक्षा घेणारी दुसरी मुलगी ठरणार आहे.

Be First to Comment