Press "Enter" to skip to content

जेएनपीटीमध्ये व्यापक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे झाले उद्घाटन

जेएनपीटीच्या हरित बंदर उपक्रमांतर्गत प्रकल्पाची उभारणी : बंदर क्षेत्रामधील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 

जेएनपीटी चे अध्यक्ष श्री. संजय सेठी, भा.प्र.से. यांनी जेएनपीटी टाऊनशिप येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन केले. जेएनपीटीने स्थायी विकासाचे लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने हरित बंदर उपक्रमांतर्गत या प्रकल्पाची उभारणी केली आहे. यावेळी जेएनपीटी चे उपाध्यक्ष श्री. उन्मेश शरद वाघ, भा.रा.से. व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

ह्या प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 10 मे.टन असून हा प्रकल्प बार्क तंत्रज्ञानावर आधारित आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार ह्या प्रकल्पाची निर्मिति करण्यात आली आहे. त्याचबरोबर बायोगॅसपासून वीज निर्मिती, बायोगॅस उत्पादन आणि वीजनिर्मिती सेटअपसह प्रति दिवशी 5 मे.टन क्षमतेचा हा प्रकल्प बायो गॅस प्लांटवर आधारित आहे. या प्रकल्पामध्ये सुका कचरा संकलित करण्यासाठी हायड्रॉलिक बिलिंग प्रेस मशीन बसविण्यात आली असून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यासाठी योग्य पार्टिशन असलेल्या दोन घंटा गाड्या आहेत, नागरिकांना जागरूकता प्रशिक्षण देण्यासाठी घनकचरा संकलन उपकरणे सुद्धा आहेत.

स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. स्वच्छ भारत मिशनची सुरवात देशभरात स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या दृष्टीकोनातून झाली आहे आणि याचा उद्देश्य नागरिकांच्या सहयोगातून स्वच्छ भारत निर्माण करने आहे. या योजनेच्या मुख्य उद्दीष्टांपैकी एक आहे आधुनिक व शास्त्रोक्त घनकचरा उपचार आणि विल्हेवाट सुविधा विकसित करणे.

बंदराच्या कामकाजाचा पर्यावरण आणि आसपासच्या परिसरावर कमीत-कमी परिणाम व्हावा यासाठी जेएनपीटी सतत स्थायी विकासावर लक्ष केंद्रित करते. पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत जेएनपीटीने विविध हरित उपक्रम हाती घेतले आहेत ज्यामध्ये सौर उर्जा, सांडपाणी पुनर्चक्रण करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई-आरटीजीसी आणि इको पार्क, सागरी संरक्षण आणि व्यापक वृक्षारोपण सारख्या उपक्रमांचा समावेश आहे. बंदर क्षेत्रात उर्जेचा वापर कमी करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बंदर परिसरात एलईडी दिवे देखील बसविण्यात आले आहे आहेत.

जेएनपीटीचे उद्दीष्ट केवळ आर्थिक कार्यक्षमता प्राप्त करणे नसून पर्यावरणीय आणि सामाजिक स्थिरता प्राप्त करने देखील आहे. अशा प्रकारे भविष्यातसुद्धा पर्यावरण संरक्षण हा जेएनपीटीच्या नियोजनाचा व कामकाजाचा एकात्मिक पैलू राहील.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.