Press "Enter" to skip to content

अपात्र रेशनकार्डकांची शोधमोहीम सुरु

एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशन कार्ड होणार रद्द !

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

केंद्र शासनाच्या माध्यमातुन अपात्र शिधा धारकांचा शोध घेऊन शिधापत्रक रद्द करण्याच्या सुचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना करण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी हि निरंतर प्रक्रिया आहे. याकरिता अपात्र शिधापत्रिका शोधुन रद्द करण्यासाठी खास शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

यामध्ये बी.पी.एल,अंत्योदय,अन्नपूर्णा , केसरी , शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्वप्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दि. १ फेब्रुवारी पासुन दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत मोहीम राबविण्यात येणार आहे.

जास्त उत्पन्न असलेला लाभार्थ्यांना रास्त धान्य भाव दुकानातून मिळणारे लाभ यामुळे बंद होणार आहे. जास्त उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. सध्याच्या घडीला श्रीमंत वर्ग देखील रेशन वरील कमी उत्पन्नामुळे सरकाराच्या योजनांचा लाभार्थी ठरत आहे. शहरातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांची या मोहिमेअंतर्गत तपासणी केली जाणार आहे. शिधावाटप दुकानात शासकीय अधिकारी , तलाठी आदी शिधापत्रिका तपासणार आहे.

तलाठ्यामार्फत दिलेला फॉर्म शिधाधारकांकडून स्वीकृत करून दिलेला फॉर्म अर्जदाराच्या स्वाक्षरीने दिनांकासह पोच देणार येणार आहे.


तालुक्यातील लाभार्थी रेशकार्डधारक
पिवळे रेशनकार्ड -६२८२
केशरी रेशनकार्ड -६४९४६
पांढरे रेशनकार्ड -७६९८८

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती –
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीत नियंत्रक शिधावाटप संचालक नागरी पुरवठा मुंबई , पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक , मुख्य कार्यकारी अधिकारी,अप्पर जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी , मुख्याधिकारी या वर्ग नगरपालिका आदी सदस्यांचा समावेश आहे. या समितीच्या माध्यमातुन या शोधमोहिमेचा आढावा घेतला जाणार आहे.

हे पुरावे आवश्यक –
भाडेपावती,निवासस्थानाचा मालकीबद्दल पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक,बँक पासबुक,विजेचे देयक,टेलिफोन, ड्रायव्हींग लायसन्स,ओळखपत्र, मतदार ओळखपत्र,आधारकार्ड आदी पुरावे तपासले जाणार आहेत. हे पुरावे एक वर्षापेक्षा जास्त काळ जुने नसल्याची खात्री करण्याचा सूचना करण्यात आलेल्या आहेत .

तर रेशनकार्ड रद्द –
दिलेल्या पुरावाच्या अनुषंगाने अ व ब असे दोन गट तयार करण्यात येणार आहेत. आवश्यक कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा अ गटात समावेश करावा तर ब गटात पुरावा न देणाऱ्यांना समाविष्ट करावे . अ गटातील शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका पूर्ववत चालु राहील तर ब गटातील शिधापत्रिका धारकांची शिधापत्रिका त्वरित निलंबित करून शिधावस्तूंचा लाभ त्वरित थांबविण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.

कोणत्या कोणत्या कारणाने रेशनकार्ड रद्द होईल –
रेशनकार्ड धारकांना शोधमोहिमे दरम्यान मागितलेल्या पुराव्यांची पूर्तता न झाल्यास रेशनकार्ड रद्द होणार आहे.महिनाभरात हि कारवाई करण्यात येणार आहे.

शोधमोहिमेला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत .
- मधुकर बोडके       (जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड) 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.