मुलीच्या प्रेमसंबधाच्या रागातून बापाने छाटले मुलीचे मुंडके : खालापूरात नदिकिनारी घडलेल्या घटनेनी सर्वञ खळबळ
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
बिहार राज्यातून आलेल्या कुटूंबातील चौदा वर्षीय मुलीच्या बापाने खून करून धड आणि शीर नदित टाकून देण्याचा धक्कादायक प्रकार खालापूर हद्दीत घडला असून या घटनेचे साक्षीदार मुलीची आई आणि बारा वर्षीय बहिणीला जबर मानसिक धक्का बसला आहे.तर घटनेनंतर क्रूरकर्मा बाप फरारी झाला आहे.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार अजय सुदर्शन सिंह (वय50,रा.सरिराॅय पोलीस ठाणे कुद्रा.जि.कैमुर,भबुआ. बिहार) हा त्याची पत्नी आणि दोन मुलीसह चार दिवसापूर्वी खालापूर तालुक्यात आला होता. खोपोली शहरातील एका लाॅजवर हे कुटूंब राहिले होते.शुक्रवारी पाच वाजता अजय पत्नी आणि मुलीसह खालापूर हद्दीतील हाळ गावानजीक म्हाडा काॅलनीच्या मागे निर्जनस्थळी गेला.मोठी मुलगी खुशी हिचे राजेश नावाच्या व्यक्तिशी असलेल्या प्रेमसंबधाच्या रागातून अजयने खुशीला चाकूने भोसकून तिचे शीर धडावेगळे केले.खूशीचे धड आणि शीर अजयने पाताळगंगा नदित फेकले.
या घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार खुशीची आई आणि बहिणीने घटनास्थळावरून हाळ गावात पळ काढला.या घटनेची माहिती जागरूक नागरिकानी पोलीसाना दिल्यानंतर उपविभागिय पोलीस अधिकारी संजय शुक्ला,पोलीस निरिक्षक अनिल विभुते,महिला पोलीस उपनिरिक्षक अंबिका अंधारे सह पोलीस पथक घटनास्थळी पोहचले.खुशीचे धड नदित सापडले असून शनिवारी नदिपाञात शोध घेवून सुद्धा शीर सापडले नव्हते.अजय खुन करून फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या घटनेनंतर खून झालेल्या मुलीचा मृतदेहापैकी धड सापडले असून शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहे.मुलीची आई आणि बहिण याचे जाबजबाब आणि पंचनामा सुरू आहे.घटनेनंतर आरोपी फरार झाला असला तरि त्याचे लोकेशन ट्रेस झाले आहे. लवकरच आरोपी ताब्यात असेल.
अनिल विभुते - पोलीस निरिक्षक खालापूर

Be First to Comment