सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील अंशिका पाटील हिने फॅशनच्या दुनियेतील ऑनलाइन स्पर्धांच्या माध्यमातून स्पर्धा जिंकत नामवंत ब्रँडच्या जाहिरातीही केल्या आहेत. यामुळे आता तिचा आत्मविश्वास वाढला असून, देशाचं प्रतिनिधित्व करत मिस वर्ल्डची स्वप्न ती बघत आहे.

उरण तालुक्यातील बोकडविरा गावात राहणारी १२ वर्षीय अंशिका राजेश पाटील सध्या मिस वर्ल्ड बनायची स्वप्न बघत आहे. यासाठी तिने आत्तापासूनच मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. २०१९ मध्ये परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये अंशिकाने प्रथम प्रवेश घेऊन या स्पर्धेचे मानकरी ठरली होती. यानंतर तिला या क्षेत्राची आवड निर्माण होऊन तिचा आत्मविश्वासही वाढला होता. पुढे तिने चारमिंग प्रिन्सेस २०१९, स्टार ऑफ महाराष्ट्र २०१९, इन्फडी रनवे, उत्सव जल्लोष २०२०, माझी प्रिन्सेस ऑफ मुंबई २०२०, रॉयल क्वीन २०२० अशा स्पर्धामधून सहभाग घेत टायटल विणर ठरली. तर नुकताच झालेल्या प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्रा २०२० या स्पर्धेमध्येही तिने आपला ठसा उमटवत स्पर्धा जिंकली आहे.

यामुळे बोकडविरा या छोट्याशा गावातून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता राज्याबाहेर सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी तिने शो स्टॉपर म्हणून देखील रॅम्प ओक केला आहे. यामध्ये पॅंटलून सारख्या मोठ्या ब्रँडच्या शोमध्येही सहभाग घेत आपली छबी उमटवली आहे. तर ऍमेझॉन आणि मॅक्स सारख्या ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी फोटोशूटही केलं आहे. कोव्हीड संसर्ग काळामध्ये लॉकडाऊन असताना घरात बसून न राहता ऑनलाईन स्पर्धा आणि स्पर्धांचा अभ्यास तिने केला आहे. तिचे आई वडील तिच्या बाबतीमध्ये पहात असलेलं स्वप्न ती पूर्ण करणार असल्याचे तीच म्हणणं आहे. तिला देशाचं प्रतिनिधित्व करत मिस वर्ल्ड ही जागतिक पातळीवरची स्पर्धा जिंकायची आहे. यासाठी तिने १२ व्या वर्षापासूनच सुरुवातही केली आहे. तर ही स्पर्धा आपल्यासाठी महत्वाची असून, तिथवर पोहचण्यासाठी खूप मेहनत घेणार असल्याचे अंशिकाने सांगि
तले.

Be First to Comment