Press "Enter" to skip to content

सुधागडच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा

सुधागड पाली येथील मॅक्मोहन कडून 710 फूट उंचीचा चित्तथरारक बाण सुळका सर

सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत ।

रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली येथील मोहन तुकाराम हुले या युवकाने बाण सुळका सर केला आहे . मोहन च्या या कामगिरीने सुधागड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व स्थरातून कौतुक होतेय.

नगर जिल्ह्यातील सांधन व्हॅली जवळील बाण सुळका सुमारे ७१० फुट उंचीचा असून पर्वतारोहणामध्ये चित्तथरारक मार्गासाठी प्रसिद्ध आहे. या मोहिमेत मॅक्मोहन समवेत पुणे व नगर जिल्ह्यातील आठ गिर्यारोहक होते. बाण सुळक्याची चढाई अत्यंत अवघड आहे. मॅक्मोहन व त्याच्या टीमने ही अवघड बाजूची चढाई विक्रमी वेळेत पूर्ण करून माथ्यावर आपल्या सर्वांची प्रेरणा व अभिमान असलेला तिरंगा प्रजासत्ताक दिनी फडकावला .

पहिल्यांदा बाण सुळका दिवंगत गिर्यारोहक मिलिंद पाठक यांनी त्यांच्या संघाने १९८६ मध्ये सर केला. त्यानंतर विवेक मराठे आणि त्यांच्या पथकाने १९९१ मध्ये या सुळक्यावर यशस्वी चढाई केली पाण्याचे दुर्भिक्ष्म, मधमाशांची मोठ-मोठी पोळी अतिशय दुर्गम प्रदेश आणि अत्यंत खडतर चढाई यामुळे गिर्यारोहकांना हा सुळका आव्हान देत असतो. तसेच मागील वर्ष १४ जानेवारी२०२० दुर्गप्रेमी गिरीभ्रमण व सेफ क्लाइंबिंग इनिशिएटिव्ह यांनी बाण सुळक्याच्या सभोवतालच्या दरी मुळे आरोहकांच्या सुरक्षेचा विचार करून जुने पारंपारिक बोर्ड बदलून नवीन महात्मा गांधी बोल्ट (एमजी बोल्ट) बसवण्यात आले आहे. त्या मोहिमेत सुद्धा मॅक्मोहन यांचा सहभाग होता.मॅक्मोहन हे गिर्यारोहण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत असून त्यांनी सह्याद्रीतील अनेक सुळके आपल्या मित्रांसह एकटीम सर केले आहेत….

बैला बैला वरील चारी बाजू ते दर वर्षी प्रॅक्टिस म्हणून सर करत असतात. ड्युक नोज, वानरलिंगी खडापारसी, गणेश- कार्तिक, वजीर, काकडमाळ- लिंगी, सिद्धीची-लिंगी,नवरा नवरी, सरसगड इत्यादी देखील या गिर्यारोहकाने सर करतात.

मॅक्मोहन यांनी बेसिक रॉक क्लिंबिंग ऍडव्हान्स रॉक क्लिंबिंग व कोचिंग कोर्स म अ फ श्रेणी सह पूर्ण केले आहेत. या पुढील अनेक मोहिमांचे नियोजन केले असून लवकरच बेसिक मौंटेनीरिंग कोर्स पूर्ण करून हिमालयीन पीक आरोहण करणार आहेत. मॅक्समोहन हे हिमालय सर करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेऊन पुढे हिमालयात देखील झेपावणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.