Press "Enter" to skip to content

दिशा कायदा कधी अंमलात आणणार – राज्य सरकारला विचारणा    

बलात्कारी आरोपीसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी – चित्राताई वाघ 

चिञाताई वाघ

इंडिया बुल्स बलात्कार प्रकरणरी गृहमंत्री यांनी जनतेची माफी मागावी – किरीट सोमय्या

माजी खासदार किरीट सोमय्या
आमदार प्रशांत ठाकूर
महापौर डॉ कविता चौतमोल

सिटी बेल लाइव्ह / पनवेल(प्रतिनिधी)

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी असलेल्या कोरोना सेंटरमध्ये महाराष्ट्राला लाजवेल अशी बलात्काराची घटना घडली आहे. कोरोना महामारीच्या काळात अगोदरच लोकांनामध्ये संभ्रम आणि भीती आहे आणि अशातच लाजिरवाण्या घटनेने तर कोरोनो सेंटरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होवून जनतेमध्ये प्रचंड रोष आणि अविश्वास निर्माण होत आहे. या घटनेतील आरोपीसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला थांबिवण्यासाठी राज्य सरकार कधी जागरूक होणार असा, सवालही त्यांनी उपस्थित केला.            कोन जवळील इंडिया बुल कॉरन्टाईन सेंटरमध्ये एका कोरोना संशयित चाळीस वर्षाच्या महिलेवर गुरुवारी रात्री अतिप्रसंग झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणामुळे राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि महापौर डॉ.कविता चौतमोल, यांनी शनिवारी संबंधित कॉरन्टाईन सेंटरला भेट दिली. त्याचबरोबर या घटनेची माहिती घेऊन पीडित महिलेची विचारपूस केली. संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली. यावेळी महिला व बाल कल्याण सभापती कुसुम म्हात्रे, आदी उपस्थित होते. कोन येथील इंडियाबुल्स मध्ये पनवेल महानगरपालिका कॉरन्टाईन सेंटर सुरु केले आहे. याठिकाणी एक हजार रुम ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.  कोरोना संशयित रुग्णांना येथे कॉरन्टाईन करून ठेवण्यात येते. आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवरही इंडियाबुल्स याठिकाणी उपचार केले जातात. शहराच्या बाहेर असलेल्या या कॉरन्टाईन व कोविड केअर सेंटरमध्ये गुरुवारी रात्री खारघर परिसरातील एका चाळीस वर्षीय महिलेवर 25 वर्षीय संशयित कोरोना संशयित रुग्णाने अतिप्रसंग केला. या घटनेमुळे कोरोना संशयित तसेच पॉझिटिव्ह महिला रुग्णांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान शनिवारी बारा वाजता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उरणचे आमदार महेश बालदी, महापालिकेच्या महिला बालकल्याण महापालिकेच्या महिला बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे यांनी इंडिया बुल याठिकाणी जाऊन गुरुवारी घडलेला दुर्दैवी घटनेची माहिती घेतली. दरम्यान कोरोना संशयित व पॉझिटिव्ह महिलांसाठी नेमकी काय व्यवस्था येथे आहे. याबाबतही भाजप नेत्यांनी जाणून घेतले. महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी प्रशासनाच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या अनुषंगाने तपास करण्यात यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत उपस्थित होते. चित्रा वाघ, डॉ कविता चौतमोल आणि कुसुम म्हात्रे यांनी पीडित महिलेची विचारपूस केली. संबंधित आरोपीला शिक्षा करण्याच्या दृष्टीकोनातून पाठपुरावा केला जाईल. अशी ग्वाही पीडिता व तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली.

प्रशासक म्हणून काम पाहणारे अधिकारी, सुरक्षा रक्षक हे देखील जबाबदार – चिञाताई वाघ

क्वांरनटाईन असलेल्या महिलेवर तिच्या रूममध्ये जावून बलात्कार केला. ही घटना निंदनीय असून समाजाला काळिमा फासणारी असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितले.  तसेच या घटनेतील आरोपी हा जबाबदार तर आहेच त्यासोबत या ठिकाणी प्रशासक म्हणून काम पाहणारे अधिकारी, सुरक्षा रक्षक हे देखील जबाबदार असून त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. राज्यातील ही पहिली घटना नसून क्वांरनटाईन सेंटरमध्ये विनयभंगासारख्या घटना अनेक घडल्या आहेत. त्यामुळे क्वांरनटाईन सेंटर हे महिलांच्या उपचारासाठी सुरक्षित आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला आहे. यासोबत राज्यातील महिलांवर लैंगिक छळ, त्याच्या हत्या सारख्या घटना घडू लागल्या आहेत. या घटनांवर आळा बसवण्यासाठी दिशा कायदा अंमलात आणला जाणार अशी घोषणा, या राज्य सरकारने केली होती. मात्र अद्याप हा कायदा अस्तित्वात आला नाही, त्याचीच आम्ही वाट बघतो आहे असा टोला वाघ यांनी लगावला आणि या पनवेलमधील घटनेतील आरोपीसह जबाबदार प्रशासनावर देखील कारवाई करावी अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.  

गृहमंत्री यांनी जनतेची माफी मागावी – किरीट सोमय्या

राज्यातील कोविड सेक्टर आणि हॉस्पिटलमधून पेशंट पळून गेल्याचे राज्यांनी पाहिले त्यासोबत मृतदेह गायब झाल्याचे आपण ऐकले आहे, त्यासोबत पनवेलमधील घटनेत एका महिलेवर बलात्कार सारखी घटना घडल्याची घटना घडली आहे. या घटनेसाठी गृहमंत्री यांनी माफी मागावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.