Press "Enter" to skip to content

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सेवाकार्याला “सकाळ सन्मान २०२१”

सिटी बेल लाइव्ह । मुंबई ।

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सेवाकार्याला “सकाळ सन्मान २०२१” देऊन गौरव करण्यात आला.

रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना “सकाळ सन्मान पुरस्कार” देऊन गौरविले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मंत्रीगण, सकाळ समूहाचे प्रमुख यावेळी मंचावर उपस्थित होते.

हा सन्मान आमच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेची नैतिक जबाबदारी समजत, कोविड काळात देशातील, महाराष्ट्रातील, माझ्या जिल्ह्यातील समाज बांधवांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान आहे. माझ्या संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्त्यांनी कोविड काळात संस्थेसोबत राहून केलेल्या कामाचे हे श्रेय आहे.

प्रितम म्हात्रे,
विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.