Press "Enter" to skip to content

तालुका कृषी अधिकारी मार्फत शेतकरी ते ग्राहक अभियान

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत उरण येथील भाजीपाला, तांदूळ, ताडगोळे इत्यादी शेतमाल कळंबोली येथील शारदा सोसायटी व सरोवर सोसायटी से.६ येथे थेट शेतकरी ते ग्राहक विक्री कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालय उरण मार्फत घेण्यात आला .

कार्यक्रमामध्ये तालुका कृषी अधिकारी श्रीमती शर्मिला जाधव,कृषी सहाय्यक श्रीमती शितल ढाकणे,थडके प्रफ़ुलत्ता, आंबुळगेकर सुसमा उपस्थित होत्या . श्रीमती शितल ढाकणे यांनी सोसायटी अध्यक्ष श्री कदम यांना तयार करून हा शेतकरी ते ग्राहक विक्री कार्यक्रम राबवला.त्यासाठी सोसायटी अध्यक्ष कदम यांनी चांगले सहकार्य केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.