वेदना
नुसते ते भास होते
की होती भावना
बोलके ते श्वास होते
की फक्त याचना
गुंतलेली मीच होते
की होती साधना
देखले ते काय होते
की फक्त योजना
राहिलेली प्रीत होती
की रीत सांग ना
पाहिलेले भास होते
की फक्त प्रेरणा
पेटलेले रान होते
की होती वासना
सोडले ते प्राण होते
की फक्त वेदना
सई मराठे, पनवेल
Be First to Comment