Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील पाणी पुरवठा दोन दिवस बंद राहणार

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषद क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीवर गळती झाल्याने दुरुस्तीचे काम करण्यासाठी कर्जत नगरपरिषद क्षेत्रात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे तरी नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कर्जत शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, कर्जत नगर परिषद पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती झाल्याने मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने शुक्रवार दि. 29 जानेवारी व शनिवार दि. 30 जानेवारी 2021 या दोन दिवशी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे तरी सर्व नागरिकांनी उपलब्ध पाणी गाड्यांचे धुणे, झाडांना पाणी घालणे, रस्त्यावर पाणी टाकणे आदी अपव्यय टाळावा. पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील आणि पाणी पुरवठा सभापती बळवंत घुमरे यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.