Press "Enter" to skip to content

बाळासाहेब ठाकरेंच्या
जयंतीनिमित्त शिक्षक सेना उरणतर्फे कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिक्षक सेनेतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार, दहावी व बारावी पास झालेल्या जिल्हा परिषद कार्यरत शिक्षकांच्या मुलांचा सत्कार, शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील गुणवंत शिक्षकांचा सत्कार, जिल्हाप्रमुख तथा मा. आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या अध्यक्षतेखाली भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका संघटक बी एन डाकी, ग्राहक सं.कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश म्हात्रे, द्रोणागिरी स्पोर्टचे महादेव घरत, उपजिल्हासंघटक ममता पाटील,शिक्षक सेनेचे कोकण विभाग कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर,जिल्हा सरचिटणीस हितेंद्र म्हात्रे,तालुका संघटक भावना म्हात्रे, प्रणिता म्हात्रे, उप तालुकाप्रमुख कमलाकर पाटील, शहरप्रमुख विनोद म्हात्रे, संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे,पंचायत समिती सदस्य हिराजी घरत, पंकज सुतार, ना. चं. कोळीसर, केंद्रप्रमुख चंदने, टी जी म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे, के पा म्हात्रे, बी.जे.म्हात्रे, नरेश पाटील, संजय केणी, मच्छिंद्र म्हात्रे, महेंद्र गावंड,रंजना केणी, राजन ठाकूर, राजश्री भगत, घुगे सर, निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते रमेश पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मनोहरशेठ भोईर यांनी सांगीतले की, शिक्षक सेनेकडून हे चांगले सामाजिक कार्य होत आहे. गोरगरीब समाजाची सेवा करणे हे पुण्याचे कार्य असून शिक्षकांकडून ते घडत आहे ह्याचा खूप आनंद होत आहे. शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या ह्या कार्यामुळे समाज प्रगतीशील,वैचारीक बनत आहे असे गौरौद्गार काढले.

कार्यक्रमाची सुरुवात संदीप गावंड यांच्या सुमधुर आवाजाने झाली तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजा पाटील, शारदा म्हात्रे, कार्याध्यक्ष जितेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष अनंत पाटील, संजय होळकर, खजिनदार दिलीप म्हात्रे, सचिव राजेश चोगले, पनवेल सरचिटणीस राजकीरण डुंगीकर, राजेश कोल्हे, वासुदेव म्हात्रे, गोपाळ घरत, च.रा.गावंड, रमेश घरत, संतोष म्हात्रे,हि. सो. म्हात्रे, रोहन म्हात्रे, अनिल म्हात्रे, उमेश म्हात्रे, नामदेव बरतोड,जयश्री गावंड, संगीता गावंड, रुपाली पाटील, प्रमिला गावंड, छाया गावंड, सुविद्य म्हात्रे, प्रेरणा ठाकूर, अन्विता घरत, अविनाश नवाले, प्रदीप म्हात्रे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गावंड यांनी केले तर आभार संजय होळकर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.