Press "Enter" to skip to content

खाने आंबिवलीत आयुर्वेदिक औषध शिबिर

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनीतील खाने आंबिवली येथे रेश्मा विजय खाने-चौधरी यांनी खाने आंबिवली येथे महिलांसाठी आयुर्वेदिक, हर्बंल केअर,होमकेअर एग्रीकल्चर आदीवर माहिती शिबीर आयोजित केले होते.या शिबिरात महिला उद्योजिका एनटीसी प्रतिनिधी आदिती अभिषेक साखरे,आरटीसी प्रतिनिधी मनोज चव्हाण,झेडटिसी प्रतिनिधी विद्या पवार यांनी उपस्थित महिलांना आयुर्वेदिक व इतर औषधांचे फायदे तोटे समजावून सांगितले.

या औषधांच्या वापराने आरोग्यास होणारा फायदा उपस्थितांना सांगितला. यावेळी खाने आंबिवली व आसपासच्या परिसरातील महिला उपस्थित होत्या. परिसरातील नागरिकांना आयुर्वेदिक, हार्बर केअर,होमकेअर, एग्रीकल्चर आदी औषधांची गरज भासल्यास रेश्मा विजय खाने-चौधरी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेश्मा विजय खाने-चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.