Press "Enter" to skip to content

सौ.शर्वरी कदम व सुशील घाटवल यांचा सत्कार

प्रेम वर्धक वारकरी संप्रदाय यांच्या तर्फे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सन्मान

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या धामणसई येथील सौ.शर्वरी शंकर कदम व सुशील घाटवल यांचा सत्कार स्वानंद सुख निवासी गुरुवर्य अलिबाकर महाराज प्रेम वर्धक वारकरी संप्रदाय रोहा यांच्या तर्फे करण्यात आला.

यावेळी स्वानंद सुख निवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेम वर्धक वारकरी संप्रदाय रोहा ते आळंदी पायी दिंडीचे संस्थापक गुरुवर्य ह.भ.प.दळवी महाराज गुरुजी,गुरुवर्य ह.भ.प.शेळके महाराज, मनोहर पाटील,व धामणसई येथील प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळ उपस्थित होत्या सर्व उपस्थितांनी विजय झालेल्या नवनिर्वाचित धामणसई ग्रामपंचायत सदस्या सौ शर्वरी कदम व सदस्य सुशील घाटवल यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.