Press "Enter" to skip to content

सुधीर जाधव यांच्या उपक्रमाचे शिवसैनिकांकडून कौतुक

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दाढी व केस कापणे सेवा मोफत

सिटी बेल लाइव्ह । गोवे कोलाड । विश्वास निकम ।

मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेले कोलाड येथे सुधीर हेअर कटिंग सलून येथे हिंदु हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसैनिक सुधीर सुदाम जाधव यांच्या स.९.०० वाजल्यापासून अनेक ग्राहकांची केस व दाढी मोफत करून एक आगळा वेगळा उपक्रम सुधीर जाधव यांनी केल्याने कोलाड शिवसैनांकडून त्यांचे कौतुक केले आहे .

कोण किती निष्ठावंत असतो त्याचे जिवंत उदाहरण बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने कोलाड येथ जयंती दिनानिमित्ताने अनुभवयास आले येथील निष्ठावंत शिवसेनेचा कार्यकर्ता सुधीर सुदाम जाधव यांनी केस व दाढी मोफत करुन एक बाळासाहेब ठाकरेचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणुन सालाहबाद प्रमाणे या वर्षी देखील सिद्ध करुन गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबवून दाखवत आहेत.

हा निष्ठावंत शिवसैनिक दरवर्षी २३ जानेवारी रोजी स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोफत केस व दाढी करुन समाजात एक वेगळा आदर्श घडवत आहे.या दिवसाचे औचित्य साधून जाधव हे एक दिवस केस दाढी काढण्यास येणाऱ्या ग्राहकांसाठी आदर्श ठरला असल्याचे या दिसत आहेत. त्यामुळं केवळ शिवसैनिकच न्हवे तर जाधव यांचे सर्वच स्थारांतून संपूर्ण दिवसभर कोलाड नाक्यावर कौतुक केले जात होते ,

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.