Press "Enter" to skip to content

पेझारीत २३ जानेवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन

स्व. प्रभाकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिबीर ; यंदाचे शिबिराचे २३ वे वर्ष 

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । आदित्य कडू ।

रायगड जिल्ह्यात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानने रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही पेझारी येथील श्रीदत्त मंदिर सभागृहात शनिवार २३ जानेवारी २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अशी माहिती श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हा प्रमुख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी दिली आहे.

हे रक्तदान शिबिर शनिवार २३ जानेवारी २०२१ रोजी श्रीदत्त मंदिर सभागृह पेझारी येथे सकाळी १० ते २ या वेळात होणार आहे.गेली २२ वर्षे सातत्याने प्रतिष्ठान रक्तदान शिबिराचे आयोजन करत असून यंदाचे शिबिराचे हे २३ वे वर्ष आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार पंडितशेठ पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

तरी अधिकाधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे दिगंबर राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. शिबिराला येणाऱ्या सर्वांनी मास्कचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे. इच्छुक  रक्तदात्यांनी दिगंबर राणे ९४२२३७१०९८, दिनानाथ कडू ९४२२६९५०३९, निकेश पाटील ९८३४७६६१५६, मुकुंद म्हात्रे ९२२६३७०७७१, नरेश म्हात्रे ९२६०६८१००१, सुमित राणे ९०२८४१४६१३ यांच्याशी संपर्क साधावा.  

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.