Press "Enter" to skip to content

जन्मोजन्मीचा सोबती

जन्मोजन्मीचा सोबती

माझा जन्म तुझ्या साठीच आहे रे
तुझ्या भेटीची आस मनी जपली रे
लहान पणीच्या भातुकलीच्या खेळातली राजा राणीची जोडी आपली रे
तू माझा निरोप घेताना गहिवरलेला चेहरा दिसतो रे
तू इकडे आलास जीवाला हुरहूर लागली होती रे
तुझ्या मनातली वेदना मी जाणून घेतली रे
एक गर्दीत तू मला दिसल्यास रोमांच उभे राहिले रे
वेड्या सारखी धावत येऊन तुझा हात धरला रे
हाताल झिडकारले काय वेडेपणा म्हणून निघून गेलास रे
तू दिसल्यास हेच मनाला मनस्वी समाधान होत आहे रे
तू माझा आहेस म्हणूनच तू दुरावला नाहीस रे
आता तुला मी व्याकुळ मनाची प्रचिती देणार आहे रे
आणि तो दिवस भाग्यचा उजाडला रे
तुला गर्दीतच ओळख पटली सुगंधा आहेस न बरी
त्याचा हात हातात घेऊन मनाचा बाण डोळ्या वाटे बाहेर पडला रे
आणि हुंदका अवरयला पदर कमी आला रे
आणि तू माझा होऊन राहिलास रे

मुकुंद इनामदार, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.