Press "Enter" to skip to content

नवीन वर्षात संसर्गजन्य आजारांचे आव्हान कायम राहण्याची भीती

कोरोना महामारीत झालेल्या जागरूकतेमुळे बर्ड फ्लू आजाराशी लढणे होणार अधिक सोपे   

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । आरोग्य प्रतिनिधी ।

जगभरात कोरोनाची साथ संपत नाही तोच भारतात बर्ड फ्लूची साथ भारतामध्ये झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर गेल्या दहा दिवसांमध्ये जवळ-जवळ चार लाखांपेक्षा जास्त पक्षांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय मंत्री संजीव बालयान यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणामध्ये बर्ड फ्लूला अधिकृत दुजोरा दिला गेला असून महाराष्ट्रात आतापर्यंत कोंबड्या, बगळे, आणि कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे.भारतीय नागरिकांचे २०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनाशी दोन हात करण्यात गेलेले असले तरीही अजूनही कोरोनावर विजय मिळवलेला नाही. कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव व संसर्ग अस्तित्वात आहे म्हणूनच २०२१ हे वर्ष आपल्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे.

कोरोना संसर्गाचे आव्हान कायम असतानाच बर्ड फ्लू आल्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले कल्याण येथील स्टारसिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे जेष्ठ फिजिशियन डॉ. उमेश कापूसकर  म्हणाले, ” कोरोना महामारीचा सामना करताना नागरिकांमध्ये या रोगाविषयी आढळलेली लक्षणे सर्वश्रुत आहेतच परंतु बर्ड फ्लूचा विचार केला तर या रोगाची लक्षणे लक्षणे सामान्य फ्लूसारखे असतात. यामध्ये श्वास घेण्यास त्रास, मळमळ होणे, ताफ, सर्दी, डोक्यात दुखणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे इत्यादी लक्षणे जाणवतात. साधारणतः बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर २ ते ८ दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते.

संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य फ्यूसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांमध्ये ताप, खोकला, घशात, उलटी, डोकेदुखी, सांधेदुखी, इनसोमनिया आणि डोळ्यांचे आजार यासारखी लक्षणे दिसून येतात. बर्ड फ्लूची लागण माणसांना होण्याची शक्यता कमी आहे. २००६ मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला होता. त्यानंतर अनेकदा भारतात बर्ड फ्लूची साथ आली. पण माणसांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही, त्यावेळी जगात फक्त ६० लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता यात ३९ लोक एकट्या इजिप्त मधले होते.”संसर्गजन्य आजार  नियंत्रणात ठेवणे हे अजूनही नागरिकांच्या हातात आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतराचे निकष पाळले तर विषाणू संसर्ग नियंत्रणात येऊ शकतो. 

बर्ड फ्लूमध्ये जनुकीय बदल झाल्यास नवा विषाणू तयार होतो. यातून तयार झालेल्या विषाणूचे गुणधर्म सांगणं सध्या कठिण आहे विषाणूचे स्वरूप बदलण्याचा (म्युटेशन) प्रकार नवा नाही. त्यामुळे घाबरू नये. कोणताही संसर्गजन्य आजार पसरवणाऱ्या विषाणूचे स्वरूप बदलतच असते. या बदलत्या स्वरूपाच्या विषाणूमध्ये आजाराची तीव्रता अधिक दिसून आलेली नसेल तर संसर्ग अधिक फैलावणार नाही, याची काळजी नागरिकांनी  घ्यायला हवी. १९९७ मध्ये बर्ड फ्लूचं माणसांमधील संसर्गाचं पहिलं प्रकरण आढळलं होतं. हाँगकाँगमधल्या पक्षी बाजारापासून याची सुरुवात झाली होती. आणि या विषाणूचा संसर्ग झालेल्या ६० टक्के लोकांचा तेव्हा मृत्यू झाला होता. परंतु आज आपण २०२१ मध्ये आहोत व वैद्यकीय तंत्रज्ञान सुद्धा आधुनिक झाले आहेत त्यामुळे संसर्गजन्य रोगाची चिंता न करता कुठलाही संसर्गजन्य आजार आपल्याला होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकांची कर्तव्य आहे, अशी माहिती डॉ. उमेश कापूसकर यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.