ताई
तायडे तुलाच गं आता
कसे विचारू कळत नाही
कवितेसाठी आता मला
का गं शब्द सुचत नाही
चारोळ्या सुचतात काही
कविता मात्र होत नाही
तुझ्याविना शब्दालाही
काहीच गंध उरत नाही
पाहतो मी तुलाच येथ
शब्दात ते उतरत नाही
कसे करावे काय करावे
तुझ्याविना कळत नाही
तुझ्यावरच्या प्रेमात गं
भान कसले उरत नाही
तुझ्याविना कोणीच ताई
मला इथे दिसत नाही
स्वानंद नंदकुमार मराठे पुणे
Be First to Comment