Press "Enter" to skip to content

ती चाचणी परीक्षा…..

ती चाचणी परीक्षा…..

पर्वा अचानक एक ऑर्डर निघाली
official visit साठी अँटीजेन चाचणी करायची वेळ आली
अन काय सांगू, जीवाची त्या इतकी घालमेल झाली !

काय करावे, कसे करावे, कुठे करावे
काही काही म्हणून सुचेना
मनाला त्या तयार करावे कसे ते काही समजेना

मग केला थोडा धीर आणि विचारले आपल्याच डॉक्टरांना…..
काय करू, कसे करू, कुठे करू, का नकोच करू… सांगा ना मला
त्यांनी सांगितले ती होते फक्त सरकारी आरोग्य केंद्राला

तगमग ती अजूनच वाढली, त्यांनी ती लगेच ओळखली
आहे का खरंच सेफ तिथे ? अनेक लोकं येतात तिथे
घाबरू नकोस म्हणल्या त्या, सध्या पर्याय नाही आपल्याला

एक दिवस मनाला तयार करण्यात गेला
आज मात्र पर्याय नाही काही उरला
मग काय स्वारी गेली आरोग्य केंद्राला

लाईन, नंबर , वेळ, लागले त्या सर्व प्रपंचाला
अँटीजेन चाचणी एकाची बघून जीव आला मेटाकुटीला
पण एका लहान मुलीची चाचणी बघून खूपच लागले मनाला

काय हे होऊन बसले, का हे असे झाले
अनेक प्रश्न व विचारांनी त्या भंडावून सोडले
दिलासा इतकाच की आता हे बरेच आटोक्यात आले

शेवटी ती चाचणी परीक्षा माझीही झाली
मनाची त्या परत घालमेल सुरु झाली
मात्र रिपोर्ट ऐकून मनाला शांती मिळाली

आपोआपच खूप हायसे वाटले
पण प्रपंच बघून तिथले सगळे
मन खूपच कष्टी झाले

मनात त्या पुनःच आले
कोवीड वॉरियर्सना सादर प्रणाम
नाहीसा कर रे भगवंता हा थैमान !

नृपाली जोशी
नवीन पनवेल
९८२२३३०४४८

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.