Press "Enter" to skip to content

रोहे वरसे येथे बाँडीशेफ फिटनेस जिमचे शानदार उद्घाटन

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे शहर वरसे ग्रा.पं.हद्दीतील येथे ता.८ रोजी फिटनेस बाँडीशेफ जिमचे शानदार उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.

तालुक्यातील संभे गावातील सानप, माळी व परिवारातील सदस्यांमार्फत सदरची जिम सुरू करण्यात आली असून जिमचे शानदार उद्घाटन फित व केक कापून वेक अँण्ड बाईट टिमचे सागर आणि संकेत,विलास कामथे,सलमान खान डुप्लिकेट जब्बार खान,वरसे येथील जेष्ठ नेते रामचंद्र म्हात्रे,नरेश पाटील,संभे माजी सरपंच राजेश सानप,संजय सानप,युवा नेते अमित मोहिते,गजानन बामणे, संजय मांडलुस्कर, डाँ.मंगेश सानप,अँड.समीर,सानप,डॉ. सागर सानप,श्याम धाटावकर,योगेश टवळे,अनंत सानप,दिवाण सानप,संतोष गंभीर,जनार्दन भगत,गणेश सानप ,विलास दहिंबेकर आदी प्रमुख मान्यवरांसह मोठ्या संख्येने संभे ग्रामस्थ, महिला व फिटनेस क्षेत्रातील युवा बाँडीगार्ड उपस्थित होते.

सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रचंड धावपळीमुळे आपण आपल्या आरोग्याकडे पुरेशा प्रमाणात लक्ष न दिल्याने अगदी चाळीशिसी वयातच विविध आजार जडले जात असल्याने सद्यस्थितीत आपले आरोग्य सद्रुढ रहावे यासाठी दैनंदिन जीवनात योग्य आहार विहाराबरोबरच व्यायामाची नितांत आवश्यकता आहे.याच उद्देशाने मुंबईचे धर्तीवर रोह्यसारख्या शहरात जिम तयार केले असून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल त्याच द्रुष्टीने अत्याधुनिक साधनसामग्री व निष्णांत तज्ञांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिम व्यावसायिक सुभाष माळी यांनी माहिती देताना पत्रकारांना सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.