Press "Enter" to skip to content

पनवेल रेल्वे पोलिसांची महिला दक्षता समितीची बैठक संपन्न

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे आज महिला दक्षता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे, पोलीस निरीक्षक चवरे, नगरसेविका दर्शना भोईर, सपना पाटील, शैला आंबेकर, गीता म्हात्रे, मनोहर मुंबईकर, आदी उपस्थित होते. या बैठकीत आरपीएफ चे 01 महिला  अधिकारी व 12 महिला सदस्य उपस्थित होत्या. सदर बैठकीदरम्यान रेल्वे परिसरात कोणतीही चीजवस्तू अगर संशयित इसम आढळल्यास तसेच महिलांचे छेडछाडीचे प्रकार,  बालमजूर अथवा कोणताही अनुचित प्रकार दिसल्यास तसेच नशापाणी केलेले इसम दिसल्यास (एनडीपीएस) ड्युटीवरील पोलीस, स्टेशन मास्तर यांना कळविण्यात यावे. तसेच रेल्वे पोलीस हेल्पलाईन 1512 व आरपीएफ हेल्पलाईन 182 वर  माहिती कळविण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच महिलांनी रात्रीच्या वेळेस महिलांचे आरक्षित डब्यातून व जास्तीत जास्त प्रवासी प्रवास करत असलेल्या डब्यातून प्रवास करावा याबाबत सूचनात्मक मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकारण करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.