Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये नगरपरिषदेच्यावतीने राजमुद्रा स्तंभाचे लोकार्पण

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषद हद्दीमध्ये राजमुद्रा स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिळालेल्या प्रोत्साहनपर अनुदानातून 2 लाख रुपये खर्च करून स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब राऊत चौक ते मुरबाड हायवेला मिळालेल्या रस्त्यावर भगवान भोईर यांच्या घरा समोरील चौक सुशोभीकरण करण्यात आला. या चौकात स्तंभावर राजमुद्रा अनावरण करण्यात आली, स्तंभाचे लोकार्पण नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका पुष्पा दगडे, विशाखा जिनगरे, संचिता पाटील, वैशाली मोरे, स्वामिनी मांजरे, सुवर्णा निलधे, नगरसेवक नितीन सावंत, बळवंत घुमरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, प्रशांत पाटील, संदीप भोईर, अरुण निघोजकर, विजय जिनगरे, नगरपरिषद कर्मचारी कल्याणी लोखंडे, ऋषिता शिंदे उपस्थित होते. लेखनिक रविंद्र लाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.