Press "Enter" to skip to content

नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव

पहा लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याबाबतचे कामगार नेते महेंद्र घरत यांचे रोखठोक भाषण

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

स्वर्गीय लोकनेते दि. बा. पाटील यांच्या ९५ व्या जयंती निमित्त नवी मुबंई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव घेऊन तो सिडको एमडी संजय मुखर्जी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी खासदार सुनील तटकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

रयत शिक्षण संस्थेचे श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्यु.कॉलेज जासई विद्यालयात व ग्रामस्थ मंडळ संघर्ष समिती जासई यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. दि.बा.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

जयंती निमित्त विद्यालयात ऑनलाईन वक्तृत्व ,निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हा अध्यक्ष, कामगार नेते सुरेश पाटील यांची भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ या फेडरेशनच्या राष्ट्रीय महामंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते विद्यालयाच्या व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे असा ठराव करून सिडको एमडी संजय मुखर्जी यांच्याकडे सुरेश पाटील यांनी सुपूर्द केला. यावेळी खासदार सुनील तटकरे व ग्रामस्थ उपस्थितीत होते.

याप्रसंगी कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कामगार नेते सुरेश पाटील, उद्योगपती चेतन साळवी, विजय शिरढोणकर, माजी सभापती नरेश घरत, जासई गाव अध्यक्ष यशवंत घरत, विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे,अविशेठ पाटील, मेघनाथ म्हात्रे, संजय ठाकूर, सुनिल घरत, अमृत ठाकूर, माणिक म्हात्रे, गोपीनाथ ठाकूर, सरपंच संतोष घरत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सदस्या, जासई ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग सर, उपमुख्याध्यापक खाडे सर, पर्यवेक्षक साळुंखे सर, रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष नुरा शेखसर विद्यालयाचे सर्व सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.