Press "Enter" to skip to content

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा : विक्रांत पाटील

अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर निषेध आंदोलने करणार… भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचा इशारा

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी त्वरित राजीनामा द्यावा त्याचप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सीबीआय कडे अथवा निवृत्त न्यायाधीश यांच्या कमिटी कडे सोपवावा अशी मागणी भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

शर्मा भगिनींना संरक्षण द्यावे, दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याने आणि त्याचा उल्लेख निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे,तसेच द्विभाऱ्या प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले असल्यास कार्यवाही व्हावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर निषेध आंदोलने करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.