राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जयंती साजरी
सिटी बेल लाइव्ह । याकुब सय्यद । नागोठणे ।
राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ व माता सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने रोहा तालुक्यातील ठिकाण आमडोशी हनुमान मंदिर येथे शेकडो महिलांनी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ माता यांची जयंती साजरी केली.

जयंतीचे नियोजन श्रीराम समर्थ कृपा महिला बचत गटाच्या महिलांनी केले होते जयंतीच्या सुरुवातीला प्रथम दीप प्रज्वलन करून प्रार्थना ही करण्यात आली तसेच कोरोनाच्या काळात पडद्याआड गेलेल्या लोकांना जयंतीच्या कार्यक्रमा मध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. आदर्श महिला ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ.रसिका गोळे सचिव सौ.जान्हवी गोळे लिपिकां सौ.प्रतीक्षा भोसले सी.आर.पी. सौ.दिपाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूत्रसंचालन (बँक सखी) सौ.वर्षा वासुदेव जांबेकर यांनी केले. जिजाऊ माता जयंती कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन सौ. संपदा जांबेकर यांनी मानले

Be First to Comment