सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नाभिक समाज पेण शहर अध्यक्ष अजय क्षीरसागर यांची पेण नागरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी नुकतीच निवड करण्यात आली असून अजय क्षीरसागर यांच्या निवडीमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांमध्ये आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. क्षीरसागर यांची पेण नगरपालिका स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाल्यामुळे त्यांचा रायगड जिल्हा नाभिक संघाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष सुधर्मा सकपाळ व पेण तालुका खजिनदार विजय साळुंखे व समाज बांधव योगेश गायकवाड यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान अजय क्षीरसागर यांना जिल्हा नाभिक संघांचे मार्गदर्शक भाई टके, जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे, जिल्हा सल्लागार शामकांत नेरपगार, जिल्हा नाभिक समाज विश्वस्त बाळासाहेब टके, रोहा तालुका अध्यक्ष रविंद्र टके, जिल्हा कार्याध्यक्ष सोपान मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पवार, जिल्हा सचिव महेंद्र माने, सह सचिव संतोष पवार, जिल्हा खजिनदार योगेश शिर्के, सह खजिनदार विवेक कदम आदींनीही अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment