Press "Enter" to skip to content

कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता “लोकनेते दि.बा.पाटील”

लोकनेते- दि.बा.पाटिल !

सूर्याचे 'ते' जणू तेज आगळे 'दिबा' जासई-रायगडात जन्मले समाज कार्यात रममाण झाले चंदनापरी निस्वार्थी झिजले...

कधी न प्रकाश-तिमिर पाहिला 'हिरा' सदा तो चमकत राहिला कधी न खाच-खळगे पाहिले 'दिबा' मार्गक्रमण करत राहिले...

वादळे - तुफाने कितीतरी आली नानांनी त्यांना जागीच शमविली समाजोन्नतीसाठी जीवन वाहिले दि.बा.पाटील साहेब 'अमर' झाले...

समाज-क्रांतीचा हा अमूल्य ठेवा आदर्श साऱ्यांनी घ्यायला हवा... मानव-धर्माचा 'दिबा'रूपी दिवा गावा-गावात जन्माला यावा... !!

©® कविश्री.अरुण दत्ताराम म्हात्रे. जासई-रायगड,मो.9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.