Press "Enter" to skip to content

जेएनपीटी बनले वीज वितरण फ्रॅन्चायझी करारावर स्वाक्षरी करणारे पहिले बंदर

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।

भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ने आपल्या क्षेत्रात वीज पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत एक सामंजस्य करार करून वितरण फ्रॅन्चायझी करार केलाआहे. जेएनपीटीच्या विश्वस्तमंडळाने 24 डिसेंबर2020 रोजी झालेल्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावा समान्यता दिली होती. या कराराद्वारे जेएनपीटी विद्युत अधिनियम2003 चे पालन करून वीज वितरण फ्रॅन्चायझी करारावर स्वाक्षरी करणारे आणि वीज पुरवठ्यातील अडचणी सोडवणारे देशातील पहिले प्रमुख पोर्ट बनले.

जेएनपीटीमध्ये पाच कंटेनर टर्मिनल आहेत जे भारतातील प्रमुख बंदरांद्वारे हाताळणी केल्या जात असलेल्या एकूण कंटेनर कार्गोच्या 50टक्क्यांहून अधिक कंटेनर कार्गोची हाताळणी करतात. जेएनपीटीने एनएसआयसीटी, बीएमसीटी आणि जीटीआयपीएलला सवलतीच्या कराराद्वारे 30 वर्षांच्या लीजवर जमीन दिली आहे आणि या सवलतीच्या करारा अंतर्गतसंबंधित टर्मिनल्सना वीजपुरवठा करण्याची जबाबदारी जेएनपीटीची आहे. फ्रेंचायझी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी महावितरणच्या अधिका-यांच्या सहकार्याने जेएनपीटीसाठी “सरकारी / अर्धसरकारी” नावाचा एक स्वतंत्र प्रवर्ग तयार केला गेला होता, ज्यात बंदरे, संरक्षण आणि एमआयडीसी इत्यादींचा समावेश असेल.

या करारा संदर्भात बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले “या करारामुळे वीज वितरणास कायदेशीर रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि या करारामुळे जेएनपीटीला आपल्या भागधारकांप्रति आपली कर्तव्यपार पाडण्यास मदत होईल. हा करार होण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही महावितरणच्या टीमचे आभारी आहोत.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.