Press "Enter" to skip to content

उच्चांकी मालवाहतुकीसह जेएनपीटीने केली वर्षाची सांगता

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) डिसेंबर, 2020 मध्ये 459,920 दशलक्ष टीईयूची हाताळणी केली. गेल्या वीस महिन्यांतील एक महिन्यात सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा हा उच्चांक आले. मागील वर्षी याच महिन्यात केलेल्या कंटेनर हाताळणीच्या तुलनेत हे9.90% अधिक आहे आणि मालवाहतुकीच्या संदर्भात डिसेंबर-2019 मध्ये हाताळलेल्या एकूण 5.79 दशलक्ष टन वाहतूकीच्या तुलनते 10.04% वाढ झाली आहे.



कंटेनर ट्रेन्सच्या बाबतीत सुद्धा जेएनपीटीने डिसेंबर2020मध्ये 556 कंटेनर ट्रेन्सची विक्रमी हाताळणी केली आहे. कंटेनर ट्रेन्सच्या सरासरी मासिक टर्मिनल हाताळणी वेळेमध्ये सुद्धा सुधारणा झाली असून ती आता सप्टेंबरमधील 6:18 तासांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये 4:42 तास झाली आहे. रेल्वेगाड्यांची सरासरी मासिक फेरीचा वेळ (यार्डमध्ये ट्रेनच्या आगमनापासून प्रस्थानापर्यंत) देखील सप्टेंबरच्या 13:34 तासांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये 9:35 तासांवर कमी झाली आहे.



कॅलेंडर वर्ष 2020 दरम्यान जेएनपीटी मध्ये एकूण 4.47 दशलक्ष टीईयूची कंटेनर वाहतूकीची हाताळणी करण्यात आली ज्यामध्ये एपीएम टर्मिनल मुंबई (जीटीआय) ने 1.69 दशलक्ष टीईयू, डीपी वर्ल्ड एनएसआयजीटीने 0.77 दशलक्ष टीईयू, डीपी वर्ल्ड एनएसआयसीटीने 0.64 दशलक्ष टीईयू, जेएनपीसीटीने 0.56 दशलक्ष टीईयू आणि बीएमसीटीने 0.81 दशलक्ष टीईयूची हाताळणी केली आहे. कॅलेंडर वर्ष 2020 दरम्यान जेएनपीटी मध्ये द्रव व अन्य कार्गोसह एकूण 62.32 दशलक्ष टन मालवाहतूक करण्यात आली.

जेएनपीटीच्या या कामगिरीबाबत बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजयसेठी, भा.प्र.से. म्हणाले की, “कॅलेंडर वर्ष 2020हे आपल्या सर्वांसाठी एक आव्हानात्मक वर्ष होते परंतु या काळात जेएनपीटीचे कामकाज निरंतर चालू ठेवण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तुंची देशातील पुरवठा साखळीसुरु ठेवण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न केले ते पाहता काही प्रमाणात नक्कीच समाधान मिळू शकेल. याकामी आमचे सर्व भागधारक आणि कर्मचार्‍यांनी जे बहुमूल्य योगदान दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे कारण सर्वांच्या सांघिक प्रयत्नामुळेच आपण कोविड 19 च्या जागतिक साथीच्या संकटाचा मुक़ाबला करु शकलो. त्याचबरोबर केंद्रीय बंदरे,जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयास सुद्धा याचे श्रेय जाते कारण कोविड 19 साथीचा व्यापार आणि वाहतुकीवर होणा-या परिणामांचा मुक़ाबला करण्यासाठी मंत्रालयाने वेळेवर व वेगवान कृती केल्या.”



मागील वर्षीआपण सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा कार्यान्वित केले ज्यामुळे कंटेनर ट्रेलर्सना थेट बंदरात प्रवेश करण्यास चालना मिळाली आहे वनिर्यात कंटेनरसाठीचा खर्च आणि वेळ कमी होण्यास मदत झाली आहे. वर्ष 2020 मध्ये, आम्ही भारतातील पहिले बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र, जेएनपीटी सेझ कार्यान्वित करु शकलो. जेएनपीटीने आपल्या भागधारकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व किनारपट्टीवरील वाहतुकीला गती देण्याची आपली कटिबद्धता पूर्ण करण्यासाठी कोस्टल बर्थचे बांधकामही पूर्ण केले आहे. या कोस्टल बर्थवर लिक्विड कार्गोसह किनारपट्टी वरील 2.5दश लक्ष टन मालवाहतुक केली जाऊ शकेल ज्यामुळे किनारपट्टी वरील व्यापारास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.