Press "Enter" to skip to content

कालनिर्णय दिनदर्शिकेत महत्त्वाच्या नोंदी करण्याचे आवाहन

सिटी बेल लाइव्ह । मनोज पाटील ।

कालनिर्णय दिनदर्शिकेत काही महत्वाच्या दिनांची नोंद करण्याबाबत उलवे येथील सामाजिक कार्येकर्ते आणि वटवृक्ष सामाजिक संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष किरण एकनाथ मढवी यांनी कालनिर्णय दिनदर्शिका कार्यालयास ई- मेल केले आहे.

गेल्या आठवड्यापासुन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाची चर्चा सुरु असतानाच उलवे येथील किरण मढवी यांनी नव्या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयन्न केला आहे .

किरण मढवी यांनी कालनिर्णय दिनदर्शिकेचे प्रमुख ज्योतिर्भास्कर जयंत शिवराम साळगांवकर यांच्या कालनिर्णय मेल वर मागणी पत्र पाठवुन कालनिर्णयमधे खालील तारखांची नोंद करण्याची प्रमुख मागणी केली आहे.

लोकनेते दि. बा. पाटील साहेब
जयंती- १३ जानेवारी
स्मृतिदिन- २४ जून
तिर्थरुप महाराष्ट्र भुषण आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी
जयंती- १ मार्च
स्मृतिदीन- ८ जुलै
तिर्थरुप पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी
जन्मदिन – १४ में
हुतात्मा भाई कोतवाल
जयंती- १ डिसेंबर
स्मृतिदिन- ०२ जानेवारी
हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील
जयंती- १९ जानेवारी
स्मृतिदिन – ०२ जानेवारी
२५ सप्टेंबर- चिरनेर जंगल सत्याग्रह हुतात्मा दिन
१६ जानेवारी- जासई येथील हुतात्मा दिन
आणि
२१ नोव्हेंबर महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिनाची
त्याचप्रमाणे जागतिक दिन व राष्ट्रीय दिनांची ही
नोंद कालनिर्णय दिनदर्शिकेत करण्याची मागणी केली आहे.
कालनिर्णय सन २०२१ मधे वरिल तारखांवर कोणाचीही नोंद नाही, त्यामुळे पुढील वर्षी त्यात नक्की बदल होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तत्पुर्वी कालनिर्णय डिजीटल अँप्सवर नव्याने वरील माहीती अपडेट करुन घेण्याची नम्र विनंती केली आहे.
लवकरच मुंबई येथील कालनिर्णय कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवुन वरिल केलेली मागणी कायमस्वरुपी करण्याबाबत शक्य तेवढे प्रयत्न करणार असल्याचे मत किरण मढवी यांनी व्यक्त केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.