Press "Enter" to skip to content

इंडिया बुल्स काॅरन्टाईन सेंटरला सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा

महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रशासनाला सूचना

सिटी बेल लाइव्ह / पनवेल/ प्रतिनिधी #

कोन इंडियाबुल्स येथील काॅरन्टाईन सेंटर मध्ये एका संशयित कोविड 19 महिला रुग्णावर 25 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. संबंधित आरोपी सुद्धा कोरोना संशयित रुग्ण आहे.

या घटनेमुळे काॅरन्टाईन सेंटर मधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेचा महापौर डॉ.कविता चौतमोल यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. इंडियाबुल्स काॅरन्टाईन सेंटरमध्ये त्वरित सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

इंडिया बुल्स येथील कोविड सेंटर याठिकाणी दि.१६ जुलै रोजी घडलले लैंगिक अत्याचाराचे प्रकरण हे खूप धक्कादायक,निंदनीय व घृणास्पद असल्याचे प्रतिक्रिया महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. या कोविड सेंटर मध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्र,रायगड तसेच नवी मुंबई येथील कोरोना संशयित रुग्णांना विलगिकरण करून ठेवण्यात आले आहे. आरोपी व पीडित महिला यांना वेगवेगळ्या मजल्यावर कोरोना संशयित म्हणून विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
कोरोना सेंटरमध्ये अशा प्रकार घडल्याने महिलावर्गाची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे. याची खबरदारी म्हणून पनवेल महानगरपालिका पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. तसेच प्रशासनाकडून तातडीने इंडिया बुल्स येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. अशा सूचना महापौर डॉ. चौतमोल यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. करोना सारख्या रोगाने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असताना असे घृणास्पद कृत्य करण्याचे धाडस एखादा नराधमच करू शकेल. अशा व्यक्तीला हैदराबाद घटनेत पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिलेली शिक्षाच दिली पाहिजे. तसेच संबंधिताचा एनकाउंटरच केले पाहिजे अशा शब्दात महापौरांनी निषेध नोंदवला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.