Press "Enter" to skip to content

अतिक्रमण करणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनाच्या चोराच्या उलट्या बोंबा

खांदा कॉलनीतील अष्टविनायक हॉस्पिटल च्या बेकायदा जाहिरात फलकावर पनवेल महानगर पालिकेचा हातोडा

बेकायदा फलक लावणे अतिक्रमण करणे तसेच पालिकेच्या कारवाईमध्ये हस्तक्षेप करून त्यांना अटकाव करणे या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

हॉस्पिटल मालकाने कोणत्या आमदारांना लावला फोन ?

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

खांदा कॉलनीतील अष्टविनायक या बहुचर्चित हॉस्पिटलने आपली जाहिरात व्हावी या हेतूने चक्क हॉस्पिटल शेजारच्या सिडको उद्यानावर आपला जाहिरातीचा भलामोठा फलक लावला हा फलक लावून अनेक महिने उलटले तरी देखील या फलकाकडे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लक्ष गेले नव्हते परंतु पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने “अ.. अतिक्रमणाचा अ.. आयुक्तांचा” ही मोहीम सुरु केली या मोहिमेद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे दाखवण्यास सुरुवात केली त्यात या अष्टविनायक हॉस्पिटलच्या अतिक्रमणाचा मुद्दा उचलण्यात आला.

त्यानुसार आज पनवेल महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईचा हातोडा या बेकायदेशीर फलकावर पडला परंतु ही कारवाई होत असताना हॉस्पिटल प्रशासनाने तुमच्याकडे या कारवाई करण्याचे ऑर्डर आहेत का अशा उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केल्या. वास्तविक पाहता कोणताही फलक लावताना मग तो स्वतःच्या मालकीच्या जागेत असला तरीदेखील महानगरपालिकेकडून परवानगी आवश्यक असते त्यातही या अष्टविनायक हॉस्पिटल ने चक्क सिडको उद्यानाच्या कंपाउंड वॉल वरच हा भलामोठा फलक ठोकला.

याबाबत सिडको किंवा महानगरपालिका यांच्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. आत्ता चार दिवसापूर्वी हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून महानगरपालिकेकडे परवानगीसाठी हालचाल करण्यात आली. मात्र महानगरपालिका किंवा सिडकोने या हॉस्पिटलला परवानगी दिली नाही. याउलट पत्रकारांच्या मागणीची दखल घेत या फलकावर कारवाईस सुरू केले. परंतु हॉस्पिटल प्रशासनाने या कारवाईत अडथळे आणण्यास सुरुवात केली.

आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, बेकायदा जाहिरातबाजी करणे बेकायदेशीरपणे फलक लावणे तसेच महानगर पालिका कर्मचाऱ्यांच्या कारवाईला विरोध करणे म्हणजेच शासकीय कामात अडथळा आणणे हे गुन्हे महानगरपालिकेकडून या हॉस्पिटल प्रशासनावर लावण्यात येतील का ?

हॉस्पिटल च्या मालकाने कोणत्या आमदारांना लावला फोन ? 

पनवेल महानगर पालिकेची कारवाई सुरू असताना अष्टविनायक हॉस्पिटल चे मालक अगरवाल यांनी कोणाला तरी फोन लावला आणि पालिका अधिकाऱ्यांना सांगितले की "फोन घ्या आमदारांशी बोला" हे आमदार नक्की कोण ? हे मात्र त्यांनी सांगितले नाही. तर पालिका अधिकाऱ्यांनी देखील तो फोन घेतला नाही.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने अतिक्रमणा विरोधात सुरू केलेल्या मोहिनीचे हे आवाहन पत्रक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.